Join us

​ ‘१०० करोडी स्टार’ वरूण धवन ठरला ‘फ्लॉप’! ‘अक्टूबर’ने केली निराशा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 7:58 AM

अभिनेता वरूण धवन हा बॉलिवूडचा ‘१०० करोडी अ‍ॅक्टर’ मानला जातो. पण या ‘१०० करोडी अ‍ॅक्टर’ला एक जोरदार धक्का बसला ...

अभिनेता वरूण धवन हा बॉलिवूडचा ‘१०० करोडी अ‍ॅक्टर’ मानला जातो. पण या ‘१०० करोडी अ‍ॅक्टर’ला एक जोरदार धक्का बसला आहे. होय, या ‘१०० करोडी अ‍ॅक्टर’चा ‘अक्टूबर’ हा चित्रपट दणकून आपटला आहे. या चित्रपटातील वरूणच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले. पण प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली. पहिल्या दिवशी बॉक्स आॅफिसवर ‘अक्टूबर’ची संथ सुरुवात झाली. यानंतरच्या पाच दिवसांत तर चित्रपटाची कमाई आणखीच मंदावली.पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने केवळ ५. ०४ कोटींचा बिझनेस केला. नाही म्हणायला दुसºया दिवशी शनिवारी चित्रपटाच्या कमाईत ५५ ते ६० टक्के वाढ झाली आणि चित्रपटाने ७ कोटींची कमाई केली. रविवारी हा आकडा ७.७४ कोटींवर गेला. पण यानंतर आलेल्या सोमवारने मात्र ‘अक्टूबर’च्या मेकर्सची पुरती निराशा केली. सोमवारी या चित्रपटाने केवळ २.७० कोटींचा गल्ला जमवला. मंगळवारी हा आकडा आणखी खाली गेला. पाचव्या दिवशी चित्रपटाने केवळ २.६१ कोटी कमावले.  म्हणजे, गत पाच दिवसांत या चित्रपटाने २५.५६ कोटींचा बिझनेस केला. ‘अक्टूबर’चा बजेट पाहता, हा चित्रपट ‘फ्लॉप’च्या यादीत गेला, असेच म्हणता येईल.ALSO READ : October Movie Review : पारिजातकाइतकाच नाजूक‘अक्टूबर’चा बजेट ४५ कोटींचा आहे. यापैकी ३५ कोटी चित्रपटाची कास्ट आणि प्रॉडक्शनवर खर्च केले गेलेत. तर १० कोटी रूपये प्रमोशनवर खर्च झालेत. पण बॉक्सआॅफिसवरची कमाई पाहता, हा लागत खर्चही निघेल की नाही, ही चिंता आहे. ‘अक्टूबर’ हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. पण या लव्हस्टोरीचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे चांगली कथा, वरूणसारखा ‘१०० करोडी स्टार’ असूनही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने वरूणच्या खात्यात पहिला ‘फ्लॉप’ चित्रपट जमा केला. आता वरूण यावर कशी प्रतिक्रिया देतो, ते बघूच.