Join us

12th Fail डायरेक्टरच्या लेकाची यशस्वी भरारी; पदार्पणात सेंच्युरी, टीम इंडियाला मिळणार स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 3:06 PM

सिनेसृष्टीला '12th Fail' सारखा सिनेमा देणाऱ्या विधु चोप्रा यांच्या मुलानेही क्रिकेट विश्वात दमदार कामगिरी केली आहे. विधु विनोद चोप्रा यांचा लेक अग्नी चोप्राने रणजी ट्रॉफीतून क्रिकेटविश्वात पदार्पण केलं आहे.

सध्या जिकडेतिकडे '12th Fail' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत असलेल्या हा सिनेमा १२वीत नापास होऊनही स्पर्धा परीक्षांचा लक्षभेद करत IPS अधिकारी झालेल्या मनोज कुमार मिश्रा यांच्या प्रवासावर आधारित आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेसृष्टीला '12th Fail' सारखा सिनेमा देणाऱ्या विधु चोप्रा यांच्या मुलानेही क्रिकेट विश्वात दमदार कामगिरी केली आहे. 

विधु विनोद चोप्रा यांचा लेक अग्नी चोप्राने रणजी ट्रॉफीतून क्रिकेटविश्वात पदार्पण केलं आहे. मिझोराम या टीमकडून अग्नी चोप्रा मैदानात उतरला. क्रिकेटविश्वाच्या पदार्पणातच अग्नीने सेंच्युरी मारत दमदार कामगिरी करत यशस्वी भरारी घेतली आहे. सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात अग्नी चोप्राने १७९ चेंडूमध्ये १६६ धावा केल्या. पहिल्याच सामन्यात अग्नीने चमकदार कामगिरी केल्यामुळे भविष्यात त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 

२५ वर्षीय अग्नीने रणजी ट्रॉफीमधून क्रिकेटविश्वात पदार्पण करण्याआधी अ गटातील ७ आणि अनेक टी-२० सामने खेळले आहेत. अग्नीने युनायटेड स्टेट्समधून क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यानंतर मुंबईत येऊन त्याने ज्युनियर क्रिकेट टीममध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मिझोराममधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑक्टोबर २०२३मध्ये अग्नीने सय्यद मुशतक अली ट्रॉफीमधून नॉर्थ इंस्टर्न स्टेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

टॅग्स :सेलिब्रिटीऑफ द फिल्ड