बॉलीवूडमध्ये फक्त सुपरस्टार्सचीच चर्चा होते. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये असे काही साईड अॅक्टर्स आहेत जे त्यांच्या हटके अभिनयामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताता. मात्र काम झाल्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे निर्माते दुर्लक्ष करताना दिसतात. अलीकडेच बी टाऊनमधून पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या वेलकम या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता स्नेहल डाबीला (Snehal dabi) 14 वर्षांपासून त्याचे मानधनच मिळालेले नाही.
स्नेहलने टाइम्सशी संवाद साधताना निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि आरोप केला की त्यांनी 14 वर्षांपासून सिनेमात का केल्याचे मानधन त्यांना देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.अनेकदा पाठपुरावा घेतल्यानंतरही मानधन मिळालेले नाही. त्याला सतत कारणं देत टाळले गेले. आता स्नेहलने इंडस्ट्रीवरही संताप व्यक्त केला.स्नेहल डाबी 2007 मध्ये आलेल्या 'वेलकम' चित्रपटात मजनू भाई म्हणजेच अनिल कपूरसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला होता. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) कतरिना कैफ (katrina Kaif), नाना पाटेकर (Nana Patekar), परेश रावल (Paresh Rawal) आणि मल्लिका शेरावत( Mallika Sherawat) यांच्या मुख्य भूमिका होत्या.या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
त्याचवेळी, आता स्नेहलने एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाचा निर्माता फिरोज नाडियाडवाला आपल्यावर कसा अन्याय करत आहे याचा खुलासा केला आहे. चित्रपटाचे मानधन न मिळाल्याबद्दल स्नेहल म्हणाला की, 'फिरोज भाई देता हुँ पैसा, देता हुँ पैसा बोल कर फक्त वेळ घालवला', तो म्हणाला की चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली, आजपर्यंत मला माझे मानधनच मिळालेले नाही.
तो म्हणाला की, फिरोज नाडियादवाला यांनी मला आता 10 कोटी रुपये दिले तरी मी त्यांच्या चित्रपटात काम करणार नाही. फिरोजभाई त्यांच्या म्हणण्यानुसार राहत नाहीत, ते फक्त कलाकारांना आश्वासनं देतात आणि नंतर विसरतात. स्नेहलने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगनंतर मानधन न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी देखील संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय यांच्या 'लाथ शेर'साठी शूटिंग केले होते, परंतु अचानक प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाचे 85 टक्के शूटिंग बंद केले. त्यानंतर मानधनही मिळाले नाही.