Join us

सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 05:49 IST

सुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले

ठळक मुद्देसुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला ‘राब्ता’ या चित्रपटासाठी मिळालेल्या १७ कोटींचा हिशोब लागलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्याबाबत सर्व आर्थिक व्यवहार तपासूनही ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे  दिसत नाही.

सुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या विजयन हे कामानिमित्त दुबईत आहेत. काेराेना झाल्यामुळे उपचार सुरू असल्याने त्यांनी ईडीला चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शविली होती. १४ जूनला वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकोरोना वायरस बातम्यामुंबई