Join us  

‘२.०’चे पोस्टर रिलीज; असा असेल अक्षयचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 7:20 PM

दाक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या आगामी ‘2.0’ या चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. ...

दाक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या आगामी ‘2.0’ या चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. रिलीज करण्यात आलेल्या दोन पोस्टर पैकी एकामध्ये रजनीकांत व अक्षय एकमेकांच्या समोर आहेत. यावर ‘द वर्ल्ड इज नॉट ओन्ली फॉर हुमन्स’ असे लिहले आहे तर दुसºया पोस्टमध्ये अक्षयचा लूक अफलातून दिसतोय. दोन दिवसांआधी अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून ‘2.0’ चा टिझर फोटो शेअर केला होता त्याही अक्षयचा फोटो असल्याचा अंदाज लावण्यात येत होता. अक्षय कुमारसह रजनीकांत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून २.०चा फोटो शेअर केला आहे. रविवारी या चित्रपटाचा पोस्टर मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये एका नेत्रदीपक सोहळ्यात लाँच करण्यात आले. या कार्यक्रमाला रजनीकांत, करण जोहर, अक्षय कुमार, दिग्दर्शक शंकरसह अनेक दिग्गज स्टार उपस्थित होते. अक्षयने शेअर केलेल्या फोटोखाली ‘दिवाळी २०१७’ असे लिहिले असल्याने हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात अक्षय कुमार डॉक्टर रिचर्डच्या भूमिकेत दिसणार असून, त्याने स्वत:वर केलेल्या प्रयोगामुळे तो कावळ्यासारखा झाला आहे. यात रजनीकांत तिहेरी भूमिकेत दिसणार असून, तो डॉक्टर वसीकरण, रोबोट चिट्टी व खलनायकाच्या भूमिक ा साकारणार आहे. एस.शंकर निर्मित २.० हा भारतीय सिनेमा सृष्टीतील आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाचे बजेट ३५० कोटीहून अधिक आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अ‍ॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजसाठी निर्मात्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. रिलीज कार्यक्रमाचे यू-ट्यूबवरून थेट प्रेक्षपणासह सोशल मीडिया ट्रेन्डसाठी खास टीम तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. रविवारी सायंकाळपासूनच २.० सोशल मीडियावर ट्रेन्ड करतो आहे. यातच अक्षयच्या अफलातून लूकमुळे आणखीच चर्चा रंगली आहे. }}}} ">http://