करण जोहरसाठी आजचा (१६ आॅक्टोबर २०१८) आनंदाचा दिवस आहे. २० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करणने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. ‘कुछ कुछ होता है’ला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यासोबतच करण जोहर यानेही दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. ‘कुछ कुछ होता है’या चित्रपटानंतर करणने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज त्याचे धर्मा प्रॉडक्शन हे प्रॉडक्शन हाऊस इंडस्ट्रीतील सर्वाधिक मोठे नाव आहे.शाहरूख खान, काजोल, राणी मुखर्जी, सलमान खान यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘कुछ कुछ होता है’बद्दल एक गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, या चित्रपटातील टीना मल्होत्रा या व्यक्तिरेखेसाठी हिरोईन शोधता शोधता करणची चांगलीच दमछाक झाली होती. टीनाची भूमिका राणी मुखर्जीने साकारली होती. पण त्याआधी एकही हिरोईन ही भूमिका करायला तयार नव्हती. स्वत: करणने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
आठ जणींनी दिला होता नकार‘राणी मुखर्जीआधी आठ अभिनेत्रींना मी या भूमिकेची आॅफर दिली होती. पण सगळ्याच जणींनी नकार दिला. आता कुणीच मिळाले नाही तर मलाच स्कर्ट घालून रोल करावा लागेल, असे त्याक्षणी मला वाटले होते. राणी त्यावेळी ‘गुलाम’ करत होती़ मी घाबरत घाबरतचं राणीकडे गेलो. कारण त्यादिवशी शाहरूख आणि आदित्य चोप्रा दोघांनाही राणीचेचं नाव सुचवले होते. पण राणीने होकार दिला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. राणीशिवाय सलमान खानच्या भूमिकेसाठीही मला दारोदार भटकावे लागले होते. ते दिवस वेगळेच होते,’ असे करणने एका मुलाखतीत सांगितले होते.
अन् पहिलाचं सीन चित्रपटातून कापावा लागला‘कुछ कुछ होता है’साठी पहिलाचं शॉट होतो, ते एका डेंटिस्टच्या क्लिनिकमधला. पण तो पहिलाचं सीन मी इतका वाईट डायरेक्ट केला होता की, तो लगेच हटवावा लागला. तो सीन चित्रपटात नाही,असे करणने सांगितले होते.
शाहरूखचा सल्ला कामी आलापहिल्या सीननंतर नंतर आम्ही लगेच कोई मिल गया, या गाण्याचे शूटींग सुरू केले. हा सल्ला शाहरूखचा होता. तू गाण्यापासून सुरूवात कऱ म्हणजे पाच दिवस फराह खान घेईल आणि नंतर तू सुरू कर, असा सल्ला मला शाहरूखने दिला होता. त्याचा तो सल्ला कामी आला आणि माझा आत्मविश्वास वाढला, असेही करण जोहरने सांगितले होते.