Join us

२०१७ मध्ये या पाच गोष्टींवर असेल सगळ्यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2017 11:34 AM

वर्षामागून वर्षे सरत जातात परंतु चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण काही कमी होत नाही. प्रेक्षकांना वास्तवाच्या दाहकतेपासून दूर स्वप्नांच्या जगात घेऊन जाणाऱ्या ...

वर्षामागून वर्षे सरत जातात परंतु चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण काही कमी होत नाही. प्रेक्षकांना वास्तवाच्या दाहकतेपासून दूर स्वप्नांच्या जगात घेऊन जाणाऱ्या चलचित्र माध्यमांबद्दल लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कुतूहल असते. २०१६ हे वर्ष बॉलीवूडसाठी लिंक-अप, ब्रेक-अप, भांडण, स्कँडल्सने अधोरेखित झाले आहे. आता या नवीन वर्षात आणखी काय वाढवून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला तर मग जाणून घेऊया २०१७ मध्ये अशा कोणत्या पाच गोष्टी असतील ज्याकडे इंडस्ट्री आणि सामान्य प्रेक्षकांची नजर राहणार आहे.बॉक्स आॅफिस​ किंगशाहरूख खान आणि सलमान खानया नव्या वर्षात काही बिग बजेट आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉक्स आॅफिसवरील या चित्रपटांचे ओपनिंग २०१७ मधील मोठी घडामोड असणार आहे़  त्यावरूनच यावर्षीचा बॉक्स आॅफिस किंग ठरेल. संजय लीला भन्साळी यांचा ’पद्मावती’ आणि ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘बाहुबली २’ या दोन बहुप्रतिक्षीत चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत़  याशिवाय सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ , शाहरूख खानचा ’रईस’ बॉक्स आॅफिसवर किती कोटींची कमाई करणार? हे जाणून घेणेही या वर्षात औत्सुक्याचे ठरणार आहे़
रणवीर-दीपिका, अनुष्का-विराट येणार का एकत्र?अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तमाम क्रिकेटपटूंच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकणार का, हे जाणून घेण्याची उत्सुकताही या वर्षात ताणली जाणार आहे़  अनुष्का-विराटप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडचे हॉट कपल लग्नबंधनात अडकणार का? याचे उत्तरही या वर्षात मिळणार आहे़  दीपिका पादुकोण व रणवीर सिंग​त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बिझनेसमॅन बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा यांचे नातेही कुठल्या वळणावर जाणार याबद्दलची उत्सुकताही या वर्षात आपण अनुभवणार आहोत़  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड बंटी सजदेव हे दोघे साखरपुडा करणार अशी चर्चा आहे़.  करिश्मा कपूर आणि तिचा बॉयफ्रेन्ड संदीप तोष्णीवाल यांच्या अफेअरचीही चर्चा आहे़  एकंदर काय, तर २०१७मध्ये या सर्व लर्व्हबर्ड्सचे रिलेशनशिप स्टेटस बदलत असेल तर ते बॉलिवूडमधील या वर्षातले मोठे हॅपनिंग असणार आहे़
तैमुरचा पहिला वाढदिवससैफ आणि करिना कपूर मुलगा तैमुरसह​नावामुळे चर्चेत आलेला आणि करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमुर या वर्षात २० डिसेंबरला एक वर्षाचा होणाऱ  त्याचा पहिला वाढदिवस ही २०१७ची बॉलीवूडमधील ‘हॅपनिंग इव्हेंट’ असणार आहे़  नवाब तैमुर अली खानचा पहिला वाढदिवस कसा सेलिब्रेट होतो, याबद्दलचे कुतूहल मनात घेऊनच बॉलीवूडप्रेमींच्या नव्या वषार्ची सुरुवात होणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नाही़ 
स्टारकिड्सचे बॉलीवूड पदार्पणआर्यन खान​श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर, किंगखान शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन, अमिताभ यांची नात नव्या नवेली चंदा आणि सैफ अली खानची मुलगी सारा या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलीवूड डेब्यूकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे़ त्यांचे ग्रँड लाँचिंग होणार, हे तर ठरलेले आहे़; पण ते कुठल्या चित्रपटातून बॉलीवूडडेब्यू करणार? कोण दिग्दर्शक त्यांना लाँच करणार? शिवाय हे लाँचिंग किती यशस्वी ठरणार? अशा अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता आहे़  या नव्या वर्षात या प्रश्नांची उत्तरे मिळालीत तर निश्चितपणे बॉलीवूडची ती एक मोठी घडामोड ठरणार आहे़सलमान या वर्षी तरी चढणार का बोहल्यावर?सलमान व यूलियाबॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार, हा आता जागतिक प्रश्न झाला आहे़  गतवर्षी सलमानचे लग्न होता होता राहिले़  कारण मध्यंतरी सलमान व यूलिया यांच्या लग्नाच्या बऱ्याच वावड्या उठल्या़  यानंतर तेवढ्याच वेगाने त्यांच्या बे्रकअपची बातमीही आली़  पण यानंतरही सलमान व युलिया एकत्र दिसले़  आता पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे़  आता सलमान लग्न करणार का? करणार तर युलियासोबत करणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास ती या वषार्तील सर्वात मोठी बातमी असणार आह़े