शाहरूख खान (Shah Rukh Khan), जूही चावला (Juhi Chawla) आणि सनी देओल (Sunny Deol) चा गाजलेला सिनेमा 'डर'ला २८ वर्षे (28 Years Of DARR) पूर्ण झाली आहेत. २४ डिसेंबर १९९३ ला हा सिनेमा रिलीज झाला होता. शाहरूखने आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांना चकित केलं होतं. आजही त्याच्या या सिनेमातील कामाचं कौतुक केलं जातं. प्रत्येक सिनेमाप्रमाणे या सिनेमाच्या मेकिंगचेही काही किस्से आहेत.
शाहरूख खान नव्हता पहिली पसंत
‘डर’ सिनेमा भूमिका करून शाहरूखने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचंही मन जिंकलं होतं. तुम्हीच विचार करा की, पडद्यावर शाहरूख खानऐवजी एका पेहलवानाने ‘तू है मेरी किरन’…कककक..किरन’ असं म्हटलं असतं तर कसं वाटलं असतं? यश चोप्रा यांनी सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा शाहरूख खान त्यांची पहिली पसंत नव्हता.
शाहरूखसाठी माइलस्टोन ठरला डर
२८ वर्षाआधी रिलीज झालेला 'डर' ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. शाहरूख खानला याच सिनेमाने ओळख दिली. पण हा रोल त्याला मिळणार नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रोलसाठी निर्माता-दिग्दर्शक आधी आमीर खानला घेणार होते. पण तो नाही म्हणाला. त्यानंतर मेकर्स संजय दत्तकडे गेले. पण त्याने निगेटीव्ह रोल करण्यास नकार दिला. इतकंच काय तर नंतर या रोलची ऑफर ऋषी कपूरलाही देण्यात आली होती. पण त्यांनीही नकार दिला.
दारा सिंहला घेणार होते मेकर्स
सिनेमात हिरो म्हणून सनी देओल होता आणि दुसरी भूमिका दमदार होती पण तो व्हिलनसारखा रोल होता. त्यामुळे कोणत्याही अभिनेत्याला त्यांची इमेज मातीत घालवायची नव्हती. त्यामुळे मेकर्स या भूमिकेसाठी दारा सिंह यांना घेण्यासाठी तयार होते. दारा सिंह यांची दमदार बॉडी पाहून मेकर्सना असं वाटलं होतं की, हिरोईनला ते घाबरवू शकतील. पण काही कारणाने दारा सिंह हा सिनेमा करू शकले नाहीत. त्यामुळे हा सिनेमा शाहरूख खानच्या झोळीत आला. हा किस्सा जुही चावलाने स्वत: एका मुलाखतीत सांगितला होता.