29 Years in Industry :२९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेले एक वचन सलमान खान आजपर्यंत पाळतोय!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 10:49 AM
आज २७ आॅगस्ट २०१७ रोजी सलमान खानला बॉलिवूडमध्ये २९ वर्षे पूर्ण झालीत. या २९ वर्षांत सलमानने अॅक्शनपासून तर रोमान्सपर्यंत ...
आज २७ आॅगस्ट २०१७ रोजी सलमान खानला बॉलिवूडमध्ये २९ वर्षे पूर्ण झालीत. या २९ वर्षांत सलमानने अॅक्शनपासून तर रोमान्सपर्यंत सगळे केले. पण एक गोष्ट मात्र सलमानने केली नाही ती नाहीच. सलमानने प्रचंड मोठी फॅन फॉलोर्इंग निर्माण केली. आज प्रत्येक अभिनेत्री सलमानची हिरोईन बनण्यास आतूर आहे. प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहे. पण हे सगळे यश सलमानने स्वबळावर मिळवले. विशेष म्हणजे, ते मिळवताना कुठलीही तडजोड केली नाही. २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेले वचन सलमान आजही पाळतो आहे, यातच सगळे आले.होय, आजपासून २९ वर्षांपूर्वी सलमानने स्वत:ला एक शब्द दिला होता. चित्रपटात कुठल्याही हिरोईनला लिप किस करणार नाही, हे ते वचन होते. खरे तर आजच्या काळात किस आणि इंटिमेट सीन्स जणू चित्रपटाच्या स्क्रिप्टची गरज झाली आहे. पण सलमानने या गरजेसाठी आपला शब्द मोडला नाही. कदाचित सलमान पहिला अभिनेता आहे, जो आजही आपल्या या शब्दावर कायम आहे. अद्याप आपल्या एकाही चित्रपटात सलमानने लिपलॉक सीन दिलेला नाही. (सूरज बडताज्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान व भाग्यश्रीचा एक ‘लिपलॉक’ सीन दिसला होता. पण प्रत्यक्षात हा सीन देताना सलमानने भाग्यश्रीला स्पर्शही केला नव्हता. सलमान व भाग्यश्री दोघांनीही लिपलॉक सीन द्यायला नकार दिला होता. त्यामुळे सूरज बडजात्यांनी काचेचा ग्लास मध्ये ठेवून हा सीन शूट केला होता.) असे असूनही सलमानचे चित्रपट हिट होतात. हिटच नाही तर सुपरडुपर हिट होतात.सलमान आपल्या चित्रपटात रोमान्स तर भरपूर करतो. पण कुठल्याही हिरोईनला किस करणे, त्याच्या तत्त्वात बचत नाही. करिअरच्या सुरुवातीपासून सलमान हा नियम फॉलो करतो आहे. तो हिरोईनला मिठीत घेतो, पण तिला किस करत नाही. याऊलट शाहरूख खान, आमिर खान, अजय देवगण असे स्टार्स इंटिमेट सीन्स करताना जराही कचरत नाहीत. कदाचित म्हणूनच भाईजान वेगळा आहे. सर्वांपेक्षा वेगळा!