रिलीज अगोदरच ‘बाहुबली-२’च्या नावे तीन मोठे रेकॉर्ड!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 10:54 AM
‘बाहुबली-२’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या २८ तारखेला रिलीज होत असून, चित्रपट समीक्षकांना खात्री आहे की, हा चित्रपट अनेक रेकॉर्डची ...
‘बाहुबली-२’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या २८ तारखेला रिलीज होत असून, चित्रपट समीक्षकांना खात्री आहे की, हा चित्रपट अनेक रेकॉर्डची नोंद आपल्या नावे करणार आहे. मात्र वास्तव हे की, चित्रपटाने रिलीज अगोदरच काही रेकॉर्ड आपल्या नावे केली आहेत. होय, एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली-२’ या चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल तीन मोठे रेकॉर्ड रिलीज अगोदरच नावे केली आहेत. ‘बाहुबली-२’ हा चित्रपट ६५०० स्क्रीन्सवर भारतभर रिलीज होणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्क्रीन्सवर रिलीज होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या अगोदर सर्वाधिक स्क्रीन्सवर रिलीज झालेला राजामौली यांचाच ‘बाहुबली-१’ हा चित्रपट होता. त्यावेळी चार हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट रिलीज केला होता. आता तुम्हीच अंदाज लावा की, ६५०० स्क्रीन्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये जेव्हा हा चित्रपट रिलीज केला जाईल, तेव्हा त्याच्या कमाईचे आकडे काय असतील? आणखी आश्चर्यकारक बाब म्हणजे ‘बाहुबली-२’च्या रिलीजनंतर एकाही खानचा चित्रपट लवकर रिलीज होणार नसल्याने या चित्रपटाच्या कमाईचे आकडे अंदाजापलीकडचे असतील यात शंका नाही. श्रीधर पिल्लई यांच्या रिपोर्टनुसार चित्रपट निर्मात्यांना थियेट्रिकल राइट्सच्या माध्यमातून चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चित्रपट २०१७ मधील सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक कमाई करणारा ठरण्याची शक्यता आहे. दुसºया रेकॉर्डविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाने रिलीज अगोदरच ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी आदि भाषांमध्ये रिलीज होणार असल्याने डिस्ट्रीब्यूटर्सने अगोदरच पैसा इन्व्हेस्ट केला आहे. रमेश बाळा यांच्या आकड्यांनुसार केवळ व्हर्जनसाठी १२० कोटी रुपयांत हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करण्यात आला आहेत. ज्यास निर्माता करण जोहर हिंदी भाषेत डिस्ट्रीब्यूट करणार आहे. तामिळ व्हर्जनसाठी ४७ कोटी, कर्नाटका ४५ कोटी, तर केरळा १० कोटी रुपयांत डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त तेलगू भाषेसाठी सर्वाधिक १३० कोटी रुपयांचे डिस्ट्रीब्यूशन राइट्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अद्यापपर्यंत चित्रपटाचे यू. एस. राइट्सचेही कलेक्शन तगडे आहे. त्यामुळे रिलीज अगोदरच या चित्रपटाची कमाई कोट्यवधी रुपयांची आहे. तिसºया रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास चित्रपटाच्या ट्रेलरनेही एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. २४ तासांतच ५० मिलियन (५ कोटी) लोकांनी हे ट्रेलर बघितले आहे. त्यामुळे ‘बाहुबली-२’ने रजनीकांत यांच्या ‘कबाली’ आमिर खानचा ‘दंगल’ आणि शाहरूख खानच्या ‘रईस’च्या ट्रेलर रेकॉर्डला धोबीपछाड दिले आहे. रिलीज अगोदरच या चित्रपटाने ऐवढे सगळे रेकॉर्ड नावावर केल्याने रिलीजनंतर नेमका काय धमाका होईल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.