'3 इडियट्स' फेम अभिनेता अखिल मिश्रा(Akhil Mishra)चे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. घरात किचनमध्ये काम करत असताना स्टूलवरुन खाली पडून त्याचा मृत्यू झाला होता. आता त्याची पत्नी सुजैन बर्नेट(Suzanne Bernert )ने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने त्या दिवशी आठवण करुन दिली आहे, ज्या दिवशी ही घटना घडली होती.
सुजैन बर्नेट हिने बरेच फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, तुला जाऊन २ महिने झाले आहेत. आताही माझा यावर विश्वास बसत नाही आहे. माझा अँकर, माझे प्रेम निघून गेले. ज्या व्यक्तीसोबत प्रत्येक क्षण व्यतित करु इच्छिते, सर्वात जास्त ज्याच्यासोबत बोलायचे होते तो निघून गेला. मी हैदराबादला शूटवर होती आणि मी तुला फोटो पाठवले होते आणि तु मला. त्या दिवशी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर बोललो होतो. माहित नव्हते की हे शेवटचे आहे. ६.१५ P.M. पासून मी तुला कॉल करत होते. त्यावेळी माहित नव्हते की, तु हॉस्पिटलमध्ये आहेस आणि कायमचा निघून जाशील. तु जिथे कुठे असशील, तुला माहित आहे की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये केले काम अखिलच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर त्याने अनेक टीव्ही मालिकेत काम केले आहे. उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम यांसारख्या मालिकेत त्याने काम केले होते. मालिकेशिवाय त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अखिल 'डॉन', 'गांधी', 'माय फादर', 'शिखर', 'कमला की मौत', 'वेल डन अब्बा' या चित्रपटांमध्ये तो झळकला होता.