Join us

​३० वर्षांपूर्वीही ‘पद्मावत’ बनवून चुकले आहेत संजय लीला भन्साळी! हा घ्या पुरावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 5:35 AM

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ची रिलीज डेट काही दिवसांवर येऊन ठेपली तरीही या चित्रपटावरून सुरू झालेला वाद थांबायची चिन्हे नाहीत. ...

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ची रिलीज डेट काही दिवसांवर येऊन ठेपली तरीही या चित्रपटावरून सुरू झालेला वाद थांबायची चिन्हे नाहीत. करणी सेनेने चित्रपटाला असलेला विरोध आणखी तीव्र केला आहे. शूटींग सुुरू झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. गेल्या महिनाभरात तर हा वाद विकोपाला पोहोचला आहे.  करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांनी हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. सुप्रीम कोर्टाने या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात टोलवला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने पाच कट्ससोबत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. सोबतच ‘पद्मावती’चे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्याचेही सुचवले. एवढेच नाही तर चित्रपटातील ‘घूमर’ गाण्यात काही बदल करण्याचेही निर्देश दिलेत. पण याऊपरही ‘पद्मावत’ला होणारा विरोध थांबलेला नाही. खरे तर भन्साळी पहिल्यांदा राणी पद्मावतीवर चित्रपट बनवत नाहीयेत. याआधीही १९८० च्या दशकात त्यांनी या कथेवर काम केले आहे. १९८८ मध्ये भन्साळींनी ‘पद्मावती’वर काम केले होते. ‘भारत एक खोज’मध्ये राणी पद्मावतीला वाहिलेला एक संपूर्ण एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर प्रसारित होणाºया ‘भारत एक खोज’ कार्यक्रमाच्या २६ व्या एपिसोडमध्ये ‘द देल्ही सल्तनत अ‍ॅण्ड पद्मावत’ या भागात राणी पद्मावतची कथा दाखवली गेली होती. आश्चर्य म्हणजे, त्यावेळी यावरून कुठलाही वाद झाला नव्हता.हा एपिसोड श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला होता आणि संजय लीला भन्साळी या टीव्ही सीरिजचे अस्टिस्टंड एडिटर होते. त्यावेळी भन्साळी आपल्या नावासोबत ‘लीला’ हे आईचे नाव लावत नव्हते. ‘भारत एक खोज’च्या त्या एपिसोडमध्ये अलाऊद्दीनला आरश्यात राणी पद्मावतीचा चेहरा दिसतो, असेही एक दृश्य होते. अर्थात या एपिसोडमध्ये ‘घूमर’ आणि राणीचे ‘जोहार’ नव्हते.ALSO READ : संजय लीला भन्साळींनी ‘पद्मावत’बद्दल केला नव्याने खुलासा! चाहत्यांचे मानले आभार!!या एपिसोडच्या शेवटी भन्साळींचे नाव अस्टिस्टंट एडिटर्सच्या श्रेय नामावलीत सगळ्यात वर होते, हे विशेष. या सीरिजमध्ये खिल्जीची भूमिका ओम पुरी यांनी तर राजा रतन सिंहची भूमिका राजेन्द्र गुप्ता यांनी साकारली होती. अभिनेत्री सीमा केळकरने राणी पद्मावती साकारली होती.