स्वत:च्याच बायोपिकसाठी धोनीने घेतले ४० कोटी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 1:09 PM
भारतीय क्रिकेट जगतातील यशस्वी कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक म्हणजेच ह्यएम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे ...
भारतीय क्रिकेट जगतातील यशस्वी कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक म्हणजेच ह्यएम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे आपल्या कहानीला मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी धोनीने निर्मात्यांकडून चक्क ४० कोटी एवढी रक्कम घेतल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. हा चित्रपट येत्या ३० तारखेला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आहेत. नीरज पांडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही गोष्ट फक्त हसण्यावारी नेली व म्हणाले की त्याना वाटत नाही की त्यांचा स्टुडिओ एवढे पैसे कुणाला देईल.