बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान(Ajaj Khan)ला २०२१ साली ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन वर्ष तुरुंगावास भोगल्यानंतर अभिनेता जामीनावर सुटला आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत तुरुंगात व्यतित केलेल्या दिवसांबद्दल सांगितले आहे. त्याच्यासाठी तो काळ फारच वाईट होता. त्याने म्हटले की, तो फक्त त्याच्या कुटुंबासाठी जिवंत राहिला. यादरम्यान तो खूप टेन्शन आणि डिप्रेशनमधून जात होता. इतकेच नाही तर सुरूवातीला तुरूंगात त्याने मुलाला भेटण्यासाठीही नकार दिला होता. जेलमध्ये असताना तो आर्यन खान आणि राज कुंदाला देखील भेटला होता.
२०२१ साली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने ड्रग्स प्रकरणात एजाज खानला अटक केले होते. त्याला अटक केल्यानंतर अभिनेत्याने दावा केला होता की, त्याच्याकडे फक्त काही झोपेच्या गोळ्या होत्या. दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एजाज खानने तुरुंगातील त्या दिवसांबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की, तुरूंगात एक दिवस एक वर्षासारखा वाटतो. मी त्या व्यक्तीबद्दल काहीच बोलू इच्छित नाही ज्यांनी माझ्या विरोधात हे प्रकरण बनवले आणि जग बघत आहे की, त्यांच्यासोबत काय होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. निर्णय देण्याआधीच मला दोषी ठरवण्यात आले. शेवटी मला सुप्रीम कोर्टातून जामिन मिळाले. मात्र मी २६ महिने तुरुंगात होतो. माझे काम चुकले आणि माझा मुलगा मोठा झाला.
डिप्रेशनमध्ये गेला होता एजाज खानएजाज खानने आर्थर रोड तुरूंगात ८०० लोकांच्या क्षमतेच्या तुलनेत ३५०० कैद्यांचं जग असलेली सर्वात गर्दीवाले तुरुंग असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, एका टॉयलेटमध्ये ४०० लोक जातात. त्या टॉयलेटची परिस्थिती इमॅजिन करा. मी टेंशन आणि डिप्रेशनमधून जात आहे. हे खूप कठीण काळ होता पण मला माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहायचे होते. ज्यात माझे ८५ वर्षीय वडील, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.
तुरूंगात प्रसिद्ध व्यक्तींची घेतली भेटएजाज खान म्हणाला की मी तुरूंगात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संजय राऊत, अरमान कोहली, आर्यन खान आणि राज कुंद्रासोबत कित्येक लोकांना भेटलो. माझ्या शत्रूवरदेखील अशी वेळ येऊ नये. मी सुरुवातीला मुलाला भेटायलाही नकार दिला. कारण त्याने मला तुरूंगात असल्याचे पाहू नये. पण अखेर मी सहा महिन्यानंतर त्याला भेटलो. कारण त्याला माझ्याकडून माझी कहाणी कळावी आणि जगासाठी मजबूत बनावे. एजाजने त्याच्या या अनुभवावर एक पुस्तक लिहिले आहे आणि त्याला त्यावर वेबसीरिज बनवायची आहे.
कोण आहे एजाज खान?एजाज खान बिग बॉस ७मध्ये झळकला होता. त्याने २००३ साली रिलीज झालेला चित्रपट पथमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि एकता कपूरची मालिका क्या होगा निम्मो कामध्येही काम केले आहे. कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना आणि रहे तेरा आशीर्वादमध्ये काम करताना पाहिले आहे.