बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्याबद्दलची ही बातमी वाचून तुम्हालाही क्षणभर धक्का बसेल. होय, केरळमधील एका महिलेने 67 वर्षांच्या अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. केवळ इतकेच नाही तर अनुराधा पौडवाल आपली बायोलॉजिकल आई असल्याचा दावा केला आहे.अनुराधा आपली आई असल्याचा दावा करणारी ही महिला तिरूवनंतपूरमची राहणारी आहे. करमाला मोडेक्स हे तिचे नाव नाव. वय वर्षे 45. याच 45 वर्षाच्या करमालाने अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात तिरुअनंतपुरम येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. अनुराधा यांच्याकडून तिने 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.
करमालाच्या दाव्यानुसार, तिचा जन्म 1974 साली झाला होता. ती अवघी चार दिवसांची असताना, अनुराधा यांनी तिला पोन्नाचन आणि अॅग्नेस या दांपत्याला दिले होते.करमालाने एका मुलाखतीत सांगितले की,‘मला जन्म देणारी आई अनुराधा पौडवाल असल्याचे मला पाच वर्षांपूर्वी कळले. माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला हे सत्य सांगितले. मी चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझे पालक पोन्नाचन आणि अॅग्नेस यांच्याकडे सोपवला. माझे वडिल आर्मीत होते आणि महाराष्ट्रात कर्तव्यावर होते. ते अनुराधा यांचे चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराधा त्यावेळी आपल्या करिअरमध्ये बिझी होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला दुसºयाला सोपवले. पण आता मला माझी परत हवीय.’
वडिलांच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर करमालाने अनुराधाशी फोनवरुन ब-याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर करमालाचा नंबर ब्लॉक करण्यात आला. आता हा प्रकरणावर अनुराधा पौडवालकाय प्रतिक्रिया देतील ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
करमालाचे वकील म्हणतात,करमाला हिचे वकील अनिल प्रसाद सांगितले की, ‘करमालाचा ज्या जीवनावर आणि बालपणावर हक्क होता, त्यापासून तिला वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अनुराधाने आमचा दावा फेटाळला तर आम्ही कोर्टाकडून डीएनए चाचणीची मागणी करू. 50 कोटींच्या नुकसान भरपाईव्यतिरिक्त अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल यांच्या मालमत्तेतही करमालाने काही टक्के हक्क सांगितला आहे. करमालाला सांभाळणारे पोन्नाचन आणि अॅग्नेस या दांम्पत्याला तीन अपत्ये होती.करमालाला त्यांनी चौथे अपत्य म्हणून सांभाळले. पोन्नाचन यांना सत्य माहित होते. पण अॅग्नेस याबद्दल अनभिज्ञ आहे. 82 वर्षांची अग्नेस सध्या अल्जाइमरने पीडित असून काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. या प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे.