Join us

4977_article

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2016 10:24 PM

कोणत्याही खेळात इतर क्षेत्रातील खेळाडूंशी तुलना करणे सोपे असत नाहीत. दिवसेंदिवस वापरत आलेले अत्याधुनिक साहित्य आणि गोल्फ कोर्सेसची बदलती पद्धती पाहून गोल्फमध्येही असे करणे अवघड आहे. यासाठी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत, यश आणि प्रभाव. यामध्ये कोणी प्रमुख स्पर्धा जिंकल्या, असे करताना कोणी खेळापलीकडे विचार केला, अशा पाच प्रमुख खेळाडूंची माहिती देत आहोत.

कोणत्याही खेळात इतर क्षेत्रातील खेळाडूंशी तुलना करणे सोपे असत नाहीत. दिवसेंदिवस वापरत आलेले अत्याधुनिक साहित्य आणि गोल्फ कोर्सेसची बदलती पद्धती पाहून गोल्फमध्येही असे करणे अवघड आहे. यासाठी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत, यश आणि प्रभाव. यामध्ये कोणी प्रमुख स्पर्धा जिंकल्या, असे करताना कोणी खेळापलीकडे विचार केला, अशा पाच प्रमुख खेळाडूंची माहिती देत आहोत.एप्रिल १९९७ पासून टायगर वुडस्ने पहिल्या क्रमांकाकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने यशापशाच्या साºया कल्पना बदलल्या. पहिल्या मास्टर्स स्पर्धेत वुड्सने १८ अंडर पार मध्ये केलेले रेकॉर्ड कोणीही विसरु शकणार नाही. यात त्याने १२ शॉटच्या अंतराने विजय मिळविला होता. (त्यापूर्वीचा विजेता टॉम काईटने २८२ गुण मिळविले होते.) १९९७ साली टायगरची सुरुवात खूप खराब झाली होती. वुडस्ने आपल्या कारकीर्दीत ७८ पीजीए टूर्स जिंकल्या आहेत. १४ प्रमुख स्पर्धेत विजेता आहे. एकाच वेळी सलग चार प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.निकोलसचा मोठेपणा त्याच्या पामर, प्लेअर, वॅटसन, ट्रेनिओ या चार प्रतिस्पर्ध्यावरुन कळतो. निकोलसने त्याच्या शारीरिक कौशल्याने आणि ताकदीने या खेळाला अधिक मोठे केले. त्याची मानसिक क्षमता, त्याशिवाय त्याची कामगिरी यांचा विचार करता, त्याने गोल्फसाठी बरेच काही केले आहे. त्याने होगान आणि पामर या दोघांच्या एकत्रित विजेत्यांपेक्षा अधिक विजेतीपदे जिंकली आहेत. त्याने एकूण ७३ पीजीए टूर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये १८ विक्रमी प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. विक्रमी सहा मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. पीजीए टूर मनी टायटल्स आठ वेळा जिंकल्या आहेत.जर जिंकणे हेच प्रमुख असेल तर गोल्फमध्ये सॅम स्रीडसारखा खेळाडू नाही. त्याच्यासारखा हळुवार, थंड डोक्याने खेळणारा कोणताही गोल्फ खेळाडू नाही. कोणत्याही खेळाडूपेक्षा स्नीडनी जिंकलेल्या स्पर्धा अधिक आहेत. त्याने एकूण ८१ पीजीए स्पर्धा जिंकल्या आहेत. १९३६ ते १९६५ या चार दशकात स्नीडनी सुमारे १३५ ते १६५ विजय मिळविले आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षीही त्यानी स्पर्धा जिंकल्या. वयाच्या ६७ व्या वर्षी क्वाड सिटी ओपन स्पर्धा जिंकली. त्यानंतर या खेळाचा अ‍ॅम्बेसेडर आणि अ‍ॅडव्होकेट म्हणून काम पाहिले. सात प्रमुख चॅम्पिअनशीप ज्यात तीन मास्टर्स आणि तीन पीजीए चॅम्पियनशीप यांचा समावेश आहेत, त्या ज़िंकल्या.अत्यंत सुंदर अशा स्वींगचा वापर करणाºयांमध्ये अर्नोल्ड पामर यांचा समावेश आहे. अनेक वेळा बाहेर जाऊन खेळणे, स्वत:च्या घरात खेळणे सारे काही त्यानी केले. एका खेळाडूप्रमाणे हरणे आणि जिंकणे हे स्वभावात होते. १९५८ ते १९६८ या काळात पामरचे राज्य होते. १९६३ साली फक्त एकदा पामरना पराभव स्वीकारावा लागला. ६० पीजीए टूर चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकल्या. यात सात प्रमुख अजिंक्यपद स्पर्धा होत्या. चार वेळा पीजीए टूर मनी चॅम्पियनशीप जिंकली.बेन होगान हे जरी पामर यांच्या तुलनेत फारशी मोठी कामगिरी करु न शकलेले खेळाडू असले तरी गोल्फमधील शॉटसाठी ते ओळखले जातात. होगान यांचे आयुष्य नेहमीच संघर्षात गेले. सुरुवातीच्या काळात ते एका अपघातातून ते वाचले. मात्र त्यांच्या फटके मारण्याच्या शैलीत फरक पडला नाही. त्यानंतर त्यांना अल्झायमर आणि कॅन्सरने गाठले. ज्यावेळी लोक खेळत होते, त्यावेळी होगान यांनी खेळाचा अभ्यास केला. सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे ते पहिल्या पाच खेळाडूंपैकी एक होते. १९७१ साली ह्युस्टन चॅम्पियनशीप ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. गुडघ्याच्या त्रासामुळे त्यांना बाहेर जावे लागले, त्यानंतर ते खेळू शकले नाहीत. होगान यांनी ६४ पीजीए स्पर्धा जिंकल्या. त्यात ९ प्रमुख होत्या.