Join us

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाच्या ५ दिवसांनंतर शत्रुघ्न सिन्हा आजारी, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:54 AM

Shatrughna Sinha : अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता जहीर इक्बालसोबत २३ जून रोजी रजिस्टर लग्न केले. या लग्नाला ५ दिवस झाल्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने अभिनेता जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत २३ जून रोजी रजिस्टर लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ५ दिवस झाल्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालसोबत मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले, त्यानंतर सोनाक्षी आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यात तथ्य नाही. अभिनेत्री जहीर इक्बालसोबत वडील शत्रुघ्न सिन्हा यांची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. ७७ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांचे काय झाले? त्यांना दवाखान्यात का दाखल केले आहे? जहीरसोबत मुलीचे लग्न झाल्यानंतर लगेचच शत्रुघ्न यांच्या तब्येतीला काय झाले? असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

या कारणासाठी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात केलंय दाखल

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. असे सांगितले जात आहे की, आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर जहीरचे मुलगी सोनाक्षीसोबतचे लग्न यादरम्यान त्यांची खूप धावपळ झाली होती. ज्यामुळे त्याच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण आला होता. त्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही, ते पूर्णपणे ठीक आहेत.

वडिलांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सोनाक्षी-जहीरनं गाठलं हॉस्पिटल

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी सोनाक्षीला मिळताच तिने पती जहीर इक्बालसोबत वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोकिलाबेन हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पॅप्सने तिला पाहिले, परंतु त्यांनी पॅप्सकडे दुर्लक्ष केले. सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ X वर ट्विटद्वारे शेअर केले होते. या ट्विटद्वारे त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आणि पाहुण्यांचे आभार मानले.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हासोनाक्षी सिन्हा