K-Dramaचे फॅन आहात? मग 'या' 5 सस्पेंस अन् थ्रिलरने भरलेल्या कोरियन सीरिजचे हिंदी रिमेक पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:54 PM2022-04-27T18:54:08+5:302022-04-27T19:03:31+5:30
Korean movie: सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले असे अनेक K-Drama आहेत ज्यांचा हिंदी रिमेक करण्यात आला.
गेल्या काही काळामध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा प्रेक्षकवर्ग ठराविक एका भाषेपूरता किंवा कलाकृतीपूरता मर्यादित राहिलेला नाही. म्हणूनच, आज अन्य भाषिक चित्रपट, वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. यामध्येच सध्या कोरिअन ड्रामा, वेबसीरिज (Korean Drama) पाहण्याकडे प्रेक्षकांची ओढ वाढली आहे. इतकंच नाही तर आजवर अनेक K-Drama चे हिंदी वा अन्य भाषेत डबिंग करुन ते चित्रपटही तयार करण्यात आले आहेत. म्हणूनच सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले असे अनेक K-Drama आहेत ज्यांचा हिंदी रिमेक करण्यात आला. त्यामुळेच हे चित्रपट कोणते ते पाहुयात.
कॉन्फिडेंशियल असाइनमेंट (Confidential Assignment) -
गेल्या काही काळात सोशल मीडियावर कॉन्फिडेंशिअल असाइन या कोरिअन चित्रपटाची बरीच चर्चा रंगली. या चित्रपटाची कथा एका गुप्तहेराभोवती फिरते. यात एका गुप्तहेराला पकडण्यासाठी साऊथ आणि नॉर्थ कोरियाची यंत्रणा कामाला लागते. या चित्रपटात अॅक्शन सीनचा पुरेपूर भरणा आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
द स्पाय अंडरकवर ऑपरेशन (The Spy undercover Operation) -
अनेक कोरिअन मुव्हीमध्ये अॅक्शन सीनचा पुरेपूर भरणा असल्याचं पाहायला मिळतं. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे द स्पाय अंडरकवर ऑपरेशन. या चित्रपटातही एका गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करत असताना किती जोखीम घ्यावी लागते हे त्याच्या पत्नीलाही माहित नसतं.
कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा
मास्टर (Master) -
ही कोरिअन क्राइम थ्रिलर मुव्ही आहे. या चित्रपटातील प्रत्येक सीन उत्तमरित्या सादर करण्यात आला असून तो पाहताना अंगावर काटा उभा राहतो.हा चित्रपट सायबर फ्रॉडवर आधारित आहे.
द डिवाइन मूव (The Divine Move)-
जर तुम्हाला अॅक्शन मुव्ही आवडत असतील तर हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडेल. यात एका अशा भावाची कथा दाखवण्यात आली आहे जो एका षडयंत्रात अडकतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यातून बाहेर पडल्यानंतर तो प्रत्येक व्यक्तीचा बदला घेण्यासाठी झपाटून जातो.
द परफेक्ट नंबर (The Perfect Number) -
ही एक मिस्ट्री थ्रिलर स्टोरी आहे. यात एका गणित शिक्षकाची कथा सांगण्यात आली आहे. यात फळ्यावरची गणित योग्य पद्धतीने सोडवणाऱ्या या शिक्षकाच्या आयुष्यातील गणित सोडवण्यास तो अयशस्वी ठरतो. त्यामुळे स्वत:च्याच आयुष्यासोबत तो कसा झगडतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.