Join us

​'या' 5 स्टार्सचे दशकातील सर्वच चित्रपट ठरले सुपरहिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 7:56 AM

-रवींद्र मोरे या दशकात बऱ्याच स्टार्सने बॉलिवूड डेब्यू केला आणि यांच्यातील काहींनी चित्रपटांना मोठे यशही मिळवून दिले. यांच्या सोबतच ...

-रवींद्र मोरे या दशकात बऱ्याच स्टार्सने बॉलिवूड डेब्यू केला आणि यांच्यातील काहींनी चित्रपटांना मोठे यशही मिळवून दिले. यांच्या सोबतच बरेच सीनियर स्टार्सदेखील आहेत ज्यांच्यासाठी हे दशक खूपच यशस्वी ठरले. विशेष म्हणजे या दशकात त्यांनी जेवढ्या चित्रपटात काम केले ते सर्वच सुपरहिट ठरले. शिवाय बक्कळ कमाईदेखील केली. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत ज्यांचे दशकातील सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले.  * आमिर खान  आमिर खानने या दशकात देल्ही बेल्ली(२०११), तलाश(२०१२), धूम 3(२०१३), पिके(२०१४), दंगल(२०१६) आणि सिक्रेट सुपरस्टार(२०१७) अशा सहा चित्रपटात काम केले आणि हे सर्वच चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले. सोबतच या चित्रपटांनी देशातच नव्हे तर विदेशातही बक्कळ कमाई केली. आमिरचा यावर्षी ठग्स आॅफ  हिंदुस्तान हा बिग बजेट चित्रपट रिलीज होणार असून हा देखील ब्लॉकबस्टर ठरेल असा अंदाज वर्तविला जात आहे. * भूमि पेडणेकर   भूमिने या दशकात दम लगाके हईशा(२०१५), टॉयलेट : एक प्रेम कथा(२०१७) आणि शुभ मंगल सावधान(२०१७) अशा तिन चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखविली आणि हे तिनही चित्रपट सुपरहिट ठरले. विशेष म्हणजे तिचा दम लगाके हईशा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने तिची बॉलिवूडमध्ये खूपच प्रशंही झाली. त्यातच टॉयलेट : एक प्रेम कथा या अक्षय कुमारसोबतच्या चित्रपटाने तर मोठी कमाई करत तिच्या करिअरला यशोशिखरापर्यंत नेले.* फवाद खान  २०१४ मध्ये खूबसुरत या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणाºया फवाद खानने या दशकात तीन चित्रपट दिले. त्याचा खूबसुरत हा चित्रपट तर हिट झालाच, सोबत २०१६ मधला कपूर अ‍ॅण्ड सन्स हा चित्रपटदेखील सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर फॉर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा अवॉर्डदेखील मिळाला होता. त्याचा २०१६ मधील ये दिल है मुश्किल हा चित्रपटदेखील सुपरहिट झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या वेळी पाकिस्तानी कलाकार म्हणून वाद निर्माण झाला होता.   * सलमान खान   बॉलिवूडचा दबंग सलमान खानने या दशकात बॅक टू बॅक १३ चित्रपटात काम केले आणि विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट सुपरहिट झालेत.  दबंग(२०१०), वीर(२०१०), बॉडिगार्ड(२०११), रेडी(२०११), दबंग 2(२०१२), एक था टायगर(२०१२), जय हो(२०१४), किक(२०१४), प्रेम रतन धन पायो(२०१५). बजरंगी भाईजान(२०१५), सुलतान(२०१६), ट्युबलाइट(२०१७) आणि टायगर जिंदा है(२०१७) असे एकाहून एक सरस चित्रपट सलमानने देऊन दर्शकांचे मनोरंजन केले.  * वरुण धवन   अल्पावधितच तरुणींच्या गळ्याचा ताईत बनलेला चॉकलेट हीरो वरुण धवनने या दशकात नऊ चित्रपट दिले आणि ते सर्वच चित्रपट सुपरहिट झालेत. स्टुडंट आॅफ द इअर(२०१२), मैं तेरा हीरो(२०१४), हंप्टी शर्मा की दुल्हनिया(२०१४), दिलवाले(२०१५),  बदलापुर(२०१५), एबीसीडी 2(२०१५), ढिश्शूम(२०१६), बद्रिनाथ की दुल्हनिया(२०१७) आणि जुडवा 2(२०१७) या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवून दर्शकांना थिएटरमध्ये खिळवून तर ठेवले शिवाय सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले.  Also Read : ​Bollywood : ‘या’ दिग्गज स्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केली बॉलिवूड एन्ट्री !