प्रतिनिधी
1.इतरांसाठी आदर्श असणा-या लतादीदी अभिनेता आणि गायक कुंदनलाल सेहगल यांना आदर्श मानायच्या. अख्ख्या जगावर आपल्या आवाजाने जादू करणा-या लतादिदी कुंदनलाल सेहगल यांच्या आवाजावर फिदा होत्या. त्या लहानपणापासून त्यांच्या आवाजतली गाणी ऐकत मोठ्या झाल्या. गायकीचे खरे संस्कार त्यांच्यावर सेहगल यांच्या गाणी ऐकतच झाले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ज्या दिवशी लता मंगेशकर सेहगल यांना भेटायला जाणार होत्या त्याच्या आदल्या दिवशीच सेहगल यांच्या निधनाची बातमी आली. आणि म्हणून लतादीदी यांचे सेहगल यांना भेटण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
2. चित्रपटसृष्टीतील एका गायकाचा लता मंगेशकर कायम तिरस्कार करायच्या. ज्या गायकाने 1940 आणि 50चा काळा त्याच्या गायकीने गाजवला तो गायक म्हणज जी.एम. दुरानी. जेव्हा दुरानी लता मंगेशकर यांच्या सोबत पहिल्यांदा रेकॉर्डींग करत होते. त्यावेळी त्यांनी लता मंगेशकरांवर काही टीप्पणी केली. जे लता दीदींना अजिबात आवडले नाही. लता दीदींनीही दुरानींसोबत कधीच काम केले नाही.
3. लतादीदींनी ओ. पी. नय्यरसाठी कधीच गाणे गायले नाही हे तर जगजाहीर आहे. त्याला कारणही तसे खासच आहे. ओ.पी नय्यर लता दीदींबरोबर एक गाणे रेकॉर्ड करणार होते. सगळी तयारी झाली होती. स्थळ वेळही निश्चित झाली होती. पण अचानक लता दीदींची तब्येत खराब झाली आणि त्या रेकॉर्डींगला आल्याच नाही. ओ.पी नय्यर यांना लता दीदींची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. आणि त्यांनी त्याचवेळी लता दीदींबरोबर कधीच काम न करण्याचा निश्चय केला होता.
4.लता मंगेशकर यांच्या घरात एक पाळीव कुत्रा आहे. हा लता दीदींचाही मोठा चाहता आहे. तो जास्तीत जास्त लता दीदींच्या रूममध्ये वळ घालवतो. संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय त्याची विशेष काळजी घेतो.
5. लता दीदीं दिवाळी निमित्त त्यांचे हितचिंतक आणि जवळच्या मित्रांना काही ना काही भेटवस्तू पाठवतात. जया बच्चन आणि हेमा मालिनी यांना देखील दरवेळी भेटवस्तू रूपात साडी पाठवतात. यावर्षी दिवाळीतच त्या आजारी पडल्या. तरीही हॉस्पिटलमध्ये असूनही त्यांनी सगळ्यांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तू देखील पाठवल्या.