Join us  

5695_article

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2016 10:00 AM

लहानपणी प्रत्येकाच्या मनात एक हिरो असतो. आपणास तो खूप आवडत असतो, आपण त्याची पूजा करतो. त्याच्यासारखे कपडे घालतो, त्याच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करतो. मोठे झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जगात सगळीकडे वाईटपणा आणि दृष्टपणा आहे. अशा हिरोजची गरज आहे, पण प्रत्यक्षात ते असत नाहीत. आपल्याला जग बदलण्यासाठी अशा हिरोजची गरज आहे. सीएनएनने अशाच नामांकित केलेल्या सुपरहिरोजची माहिती या ठिकाणी देत आहोत.

लहानपणी प्रत्येकाच्या मनात एक हिरो असतो. आपणास तो खूप आवडत असतो, आपण त्याची पूजा करतो. त्याच्यासारखे कपडे घालतो, त्याच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करतो. मोठे झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जगात सगळीकडे वाईटपणा आणि दृष्टपणा आहे. अशा हिरोजची गरज आहे, पण प्रत्यक्षात ते असत नाहीत. आपल्याला जग बदलण्यासाठी अशा हिरोजची गरज आहे. सीएनएनने अशाच नामांकित केलेल्या सुपरहिरोजची माहिती या ठिकाणी देत आहोत.संयुक्त राष्टÑाच्या अनुसार २०१२ साली सशस्त्र गटाने मुलींना शिक्ष्इङ्मेुं८ाण देणाºया शाळांवर १८५ वेळा हल्ले केले आहेत. रजिया जान यांच्या अनुसार प्रत्येक दिवशी एका मुलीवर अ‍ॅसिडचा हल्ला होतो, किंवा विष देऊन मारण्याचा प्रयत्न होतो. धमक्यांना न घाबरता रजिया यांनी झाबुली एज्युकेशन सेंटरची स्थापना केली. जवळपासच्या सात खेड्यातील सुमारे ३५४ मुली या शाळेत येतात. दोन मजली आणि १४ खोल्यांच्या या इमारतीच्या संरक्षणासाठी दगडी भिंत बांधण्यात आली आहे. सुरक्षारक्षक रोज हवा आणि पाण्याची तपासणी करीत असतात. प्रत्येक वर्षी प्रति मुलीना शिक्षण देण्यासाठी ३०० डॉलर्स इतका खर्च आहे. अशासकीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीवर ही शाळा चालते.वयाच्या सहाव्या वर्षी बलात्कार झाल्यानंतर आणि वयाच्या नवव्या वर्षापर्यंत अनाथ असलेल्या बेट्टी यांनी फळे आणि भाजीपाला विकून आपले शिक्षण पूर्ण केले. १९९९ साली त्यांनी गर्ल चाईल्ड नेटवर्कची (जीसीएन)स्थापना केली. झिम्बाब्वेमधील ५८ पैकी ३५ जिल्ह्यात ही संस्था कार्य करते. शाळेतील मुलींना एकत्र करणे आणि त्यांना बोलणे, तक्रारी करण्यासाठी त्या प्रवृत्त करतात. बेट्टी यांनी ७००० मुलींना आतापर्यंत वाचविण्यास यश आले.१९८४ साली डॉ. रिक होड्स महिलांना मदत करण्यासाठी इथिओपियामध्ये गेले. त्या ठिकाणी वर्षभर काम करण्याचा त्यांचा इरादा होता. आफ्रिकन लोकांची गरज पाहून त्यांनी मदत करण्याचे ठरविले. ते आदिस अबाबा आणि गोंडर या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केले. अजूनही ते सुरूच आहे. त्यांनी लसीकरण, कुटुंब नियोजन, सामाजिक स्वास्थ्य या क्षेत्रात काम केले. ४८ तासात १४ हजार इथिओपिन्सना इस्त्राईलमध्ये नेण्यास त्यांनी खूप मदत केली.१९७९ साली भारतामध्ये प्रवास करीत असताना मार्क गोल्ड यांना अत्यंत भयावह आजार झालेली महिला आढळली. त्यांनी अँटीबायोटिक्ससाठी १ डॉलर आणि नंतर इतर साधनांसाठी ३० डॉलर्स खर्च केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आपण काही मोठी मदत केली नाही. माघारी गेल्यानंतर त्यांनी आपल्या १०० मित्रांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली. या वेळी ६७ देशातील २२ मदत केंद्रात ते काम करीत आहेत. त्यांनी सहा लाख डॉलर्स इतकी मदत गोळा केली. यामध्ये सायकल, भातापासून ते शिवणयंत्रापर्यंत समावेश होता. झोपडपट्टी, रुग्णालये, अनाथालये या ठिकाणी त्यांनी काम केले.नारायणन कृष्णन हे नावाजलेले शेफ. आपल्या क्षेत्रात त्यांना मोठी संधी असताना त्यांना भोजनाअभावी एक वृद्ध मनुष्य स्वत:ची विष्ठा खात असल्याचे आढळले. त्यांनी लगेचच राजीनामा दिला. त्यांनी अक्षय ट्रस्टची स्थापना केली. मदुराई, तामिळनाडू येथे त्यांनी अपंगासाठी कार्य करण्यास सुरुवात केली. कृष्णन यांच्याकडे नेहमी कंगवा, कात्री आणि ब्लेड असतो. कृष्णन हे आपल्या सहकाºयांसोबत त्याच ठिकाणी झोपतात.