Join us

बादशाह ते एमीवे बंटाय; या लोकप्रिय रॅपर्सची खरी नावे वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:08 PM

सध्या बॉलिवूडमध्ये रॅप सॉन्गचा ट्रेंड आहे. बादशाहपासून हनी सिंगपर्यंत अनेक रॅपर्सनी आपल्या रॅप सॉन्सनी चाहत्यांना वेड लावले आहे. पण  तुमच्या या रॅपर्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत?

ठळक मुद्देएमीवे बंटाय यंगस्टर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रणपीर सिंगच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातही तो झळकला होता.

सध्या बॉलिवूडमध्ये रॅप सॉन्गचा ट्रेंड आहे. बादशाहपासून हनी सिंगपर्यंत अनेक रॅपर्सनी आपल्या रॅप सॉन्सनी चाहत्यांना वेड लावले आहे. पण  तुमच्या या रॅपर्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत? होय, आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या रॅपर्सची खरी नावे सांगणार आहोत.

 बादशाह

सिंगर, रॅपर बादशाहला कोण ओळखत नाही? लवकरच बादशाह सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू करतोय. बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया आहे. एका मुलाखतीत त्याने नाव का बदलले, हे सांगितले होते. प्रत्येक गाण्यात मी माझे पूर्ण नाव लिहिले असते तर गाणे संपले असते आणि माझे नाव तेवढे दिसले असते, असे तो गमतीत म्हणाला होता.

रफ्तार

रफ्तार या नावाने ओळखला जाणा-या या रॅपरचे खरे नाव दिलीन नायर आहे.रफ्तारने नाव का बदलले, यामागेही कारण आहे. तो सांगतो, हजरजबाबीपणा हा रॅपरचा खास गुण असतो. रॅप बॅटलमध्ये तुम्ही मला एक शब्द देता आणि मला त्याचे ताबडतोब उत्तर द्यायचे असते. म्हणून मी स्वत:साठी रफ्तार हे नाव निवडले.

यो यो हनी सिंग

इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच चाहत्यांच्या मनात एक खास जागा निर्माण करणारा यो यो हनी सिंग रॅप साँन्ग लिहितो आणि कंम्पोजही करतो. त्याच्या गाण्याचे शब्द अनेकदा वाद ओढवून घेतात. पण तरीही हनीचे असंख्य चाहते आहेत. याच हनी सिंगचे याचे खरे नाव हिरदेश सिंग आहे.

बोहेमिया

रॅपर बोहेमियाने 2012 मध्ये स्वत:ला अल्बम लॉन्च केला आणि एका रात्रीत स्टार झाला. भारताच्या रॅम्प इंडस्ट्रीचा पायोनियर म्हणून त्याला ओळखले जाते. त्याचे खरे नाव रोजर डेविड आहे.

हार्ड कौर

भारतात मेल रॅपर आहेत. पण या गर्दीत काही फिमेल रॅपर्सही आपली ओळख टिकवून आहेत. यातलेच एक नाव म्हणजे हार्ड कौर.  एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे.

एमीवे बंटाय

एमीवे बंटाय यंगस्टर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रणपीर सिंगच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातही तो झळकला होता. याच एमीवे बंटायचे खरे नाव बिलाल शेख असे आहे.

टॅग्स :बादशहाहनी सिंह