युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या युरोपियन फिल्म फेस्टिव्हल २०२१ येत्या नोव्हेंबर महिन्यात साजरा होत आहे. महोत्सवाचे हे २६ वे वर्ष असून त्यात नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या ६० उत्तम कलाकृतीचा भारतीय रसिकांना आस्वाद घेता येईल.
या महोत्सवामध्ये समीक्षकांच्या पंसतीस उतरलेले समकालीन युरोपियन चित्रपट आहेत. या चित्रपटांनी कान्स, लोकार्नो,सॅन सेबेस्टियन, कार्लोवीवेरी आणि व्हेनिस सारख्या महोत्सवांत आपला ठसा उमटवला. डिजिटल पुनर्संचयित आणि पुनर्रचित चित्रपटांचा एक वेगळ प्रदर्शन यावेळी होईल. ज्यात प्रसिध्द हंगेरियन दिग्दर्शक मार्ता मेस्ज़ारोस' 'द गर्ल, ऑस्कर-विजेत्या क्लोजली वॉच ट्रेन्स, रोझेलिनी न्युरोलिस्ट ड्रामा रोम, ओपन सिटी आणि द लास्ट स्टेज वान्डा जाकोबोवस्का यांता समावेश आहे. गौरवशाली भारतीय चित्रपट सृष्टीच्या वारशाला सलाम करताना आणि सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना आंदराजली म्हणून, या महोत्सवात प्रेक्षकांना सर्जनशिलतून साकारलेल्या अनेक अभिजात गोष्टींचा आस्वाद घेता येईल.हा महोत्सव चित्रपटसृष्टीसाठी यूरोपला नवीन संधी निर्माण करणारा ठरेल. ज्यात युरोपियन आणि भारतीय चित्रपट उद्योगाच्या प्रतिभेची नव्याने ओळख होईल. व्यावसायिक भारतीय पटकथा लेखकांसाठी एक स्क्रिप्ट डेव्हलपमेंट वर्कशॉपचा अर्थात संहीता कार्यशाळेचा समावेश यात असेल. महोत्सवमुळे भारत आणि यूरोप यांच्या सर्जनशीलता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याचे आदानप्रदान वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.