हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कारचा वितरण सोहळा शनिवारी रात्री आसामच्या गुवाहाटीमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग, आलिया भटच्या ‘गली बॉय’चा दबदबा पाहायला मिळाला. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘गली बॉय’ने तब्बल 10 पुरस्कार पटकावत या सोहळ्यात बाजी मारली. मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिनेही 65व्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरले.
A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on Feb 15, 2020 at 2:00pm PST
अमृता ठरली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
अभिनेत्री अमृता सुभाषला गल्ली बॉय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमृता सुभाषने ‘गली बॉय’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट सोबत स्क्रीन शेअर केली होती. दोन दिग्गज कलाकार असतानाही अमृतानेआपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
‘गली बॉय’ बेस्ट
रणवीर व आलियाच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ या सिनेमाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारांची लयलूट केली. ‘गली बॉय’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. याच चित्रपटासाठी रणवीर सिंग आणि आलिया भट यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मान मिळवला.
फिल्मफेअर पुरस्कारांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट सिनेमा : गली बॉय
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती): आर्टीकल १५ आणि सोनचिरीया
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू, (सांड की आँख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती): आयुषमान खुराना, (आर्टीकल १५)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथाः अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, (आर्टिकल १५)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): अभिमन्नू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण): अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य धर, (उरी: दसर्जिकल स्ट्राइक)
सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः अरिजीत सिंह - कलंक नही, (कलंक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः शिल्पा राव - घुंगरू (वॉर)
जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी
एक्सलन्स इन सिनेमा : गोविंदा