Join us

अचानक भडकले या तामिळ सुपरस्टार्सचे फॅन्स, ज्युरींना पाठवले ‘हेट मेल्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:02 PM

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे हेड ज्युरी मेंबर आणि दिग्दर्शक राहुल रवैल सध्या तामिळ सुपरस्टारच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत.

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे हेड ज्युरी मेंबर आणि दिग्दर्शक राहुल रवैल सध्या तामिळ सुपरस्टार ममुटी यांच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली अगदी त्या दिवसांपासून राहुल रवैल यांना ममुटींच्या चाहत्यांकडून ‘हेट मेल्स’ मिळत आहेत. राहुल यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.गत 9 आॅगस्टला एका पत्रपरिषदेत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. पण यात तामिळ सुपरस्टार ममुटी यांचे नाव नव्हते. ममुटी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार न मिळाल्याने त्यांचे चाहते संतापले आणि त्यांनी या पुरस्कारांच्या ज्युरी सदस्यांना लक्ष्य करणे सुरु केले.

सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटांच्या श्रेणीत ‘बारम’ या चित्रपटाची निवड केल्याबद्दलही ममुटींच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला.   ‘पेरान्बू’ या चित्रपटासाठी ममुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार  मिळावा, अशी ममुटींच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण ममुटी यांना पुरस्कार न मिळताच चाहते भडकले आणि त्यांनी राहुल रवैल यांना संताप व्यक्त करणारे मेल्स पाठवणे सुरु केले.राहुल रवैल यांनी फेसबुकवर याबद्दल लिहिले. ‘हॅलो मिस्टर ममुटी. खूप हेट मेल्स आलेत. जे प्रचंड अभद्र भाषेत आहेत. अर्थातच तुमच्या फॅन्सचे किंवा तुमच्या फॅन क्लबकडून. तुम्हाला ‘पेरान्बू’साठी बेस्ट अ‍ॅक्टर नॅशनल अवार्ड न मिळाल्याने ते संतापले आहेत. खरे सांगायचे तर कुणालाही ज्युरींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, पेरान्बूला रिजनल पॅनलनेच नाकारले होते आणि त्यामुळे हा चित्रपट सेंट्रल पॅनलमध्ये नव्हता. तुमच्या चाहत्यांना यामुळे लढणे बंद करायला हवे,’ असे त्यांनी लिहिले.

राहुल यांच्या पोस्टवर ममुटी यांनीही अतिशय विनम्रपणे उत्तर दिले. ‘माफ करा सर, पण मला याबद्दल काहीही ठाऊक नव्हते. याऊपरही जे काही झाले त्यासाठी मी माफी मागतो,’ असे त्यांनी लिहिले. यानंतर राहुल रवैल यांनी दोन्ही पोस्ट डिलीट केल्या.पेरान्बू या चित्रपटात ममुटी यांनी 14 वर्षांच्या मुलीच्या पित्याची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे चौफेर कौतुक झाले होते.

टॅग्स :ममूटीराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018