६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेला नॅशनल मीडिया सेंटरमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमागृहात रिलीज झालेला चित्रपट छिछोरेला मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे. तर नॉन फिचर फिल्म विभागात हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 'एन इंजीनियर्ड ड्रीम'ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत गाबाने केले आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारात चार चित्रपट बिरियानी, जोना की पोरबा (आसमिया), लता भगवान करे (मराठी)आणि पिकासो (मराठी) ला मिळाला आहे.
यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण ४६१ चित्रपटांचा समावेश होता. २०१९ मधील मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.२०२० वर्षे कोरोना व्हायरसच्या महारोगराईच्या संकटात गेले आणि त्यामुळे आज २०१९ साली बनलेल्या चित्रपटांचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.कोरोनामुळे मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. जी ३ मे, २०२० रोजी पार पडणार होती. त्यामुळे यंदा २०१९ सालातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.