Join us

68th National Film Awards : ६८ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, 'तान्हाजी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 5:03 PM

68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहिर करण्यात आले.

68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहिर करण्यात आले. यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने आपलं नाव कोरलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. अजय देवगणला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ तर सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवार्ड विभागून देण्यात येणार आहे.

शांतू रोडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ हा अजय देवगणचा सिनेमा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा ठरला आहे.  

 चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणा-या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.  या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्या वर्षी पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'शामची आई' या चित्रपटाला देण्यात आला होता.

पाहा, पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट  अभिनेता- अजय देवगन (तान्हाजी: द अनसंग वॉरियर) आणि सूर्या (सोरारई पोटरू) 

सर्वोत्कृष्ट  हिन्दी चित्रपट- तुलसीदास जूनियर (आशुतोष गोवारीकर) 

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- तान्हाजी: द अनसंग वॉरियर 

सर्वोत्कृष्ट  फीचर फिल्म- सोरारई पोटरू (तामिळ)

सर्वोत्कृष्ट  अभिनेत्री- अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरू) 

सर्वोत्कृष्ट गीतकार- मनोज मुन्तशिर (सायना)

बेस्ट बुक ऑन सिनेमा- द लॉन्गेस्ट किस- किश्वर देसाई इसके लेखक हैं. 

बेस्ट नरेशन ‘वॉयस ओवर’ अवार्ड-  शोभा थरूर श्रीनिवासन (रैप्सोडी ऑफ रेन- मॉनसून ऑफ केरल)

बेस्ट म्यूजिक डायरेक्टर- विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)

मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट- मध्य प्रदेश

बेस्ट फिल्म ऑन सोशल इस्यू- जस्टिस डिलेड बट डिलिवर्ड आणि थ्री सिस्टर्स (विभागून)

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018