Join us

68th National Film Awards : मनोज मुंतशिर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर, 'इतना ख़ुश हूँ कि आज रो दूँगा' म्हणत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 5:50 PM

68th National Film Awards: मनोज मुंतशिर (Manoj Muntashir ) यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे.

चित्रपटांशी संबंधित देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर होत आहेत. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Awards) सोहळ्यात विविध शैलीतील आणि भाषांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना गौरविण्यात येत आहे. यावर्षीच्या चित्रपट पुरस्कारांसाठी १० सदस्यीय ज्युरीचे चित्रपट निर्माते विपुल शाह अध्यक्ष आहेत. हे चित्रपट पुरस्कार २०२० मध्ये प्रमाणित चित्रपटांना देण्यात आले आहेत. 'जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड' आणि 'थ्री सिस्टर्स' यांना ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ तर साउथचा अभिनेता सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवार्ड विभागून देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार प्रसिद्ध गायक, गीतकार मनोज मुंतशिर (Manoj Muntashir ) यांना मिळाला आहे.

हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक, गीतकार मनोज मुंताशीर यांना सायना चित्रपटासाठी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनोज मुंतशिर यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “सब्र जितना है सारा खो दूँगा..इतना ख़ुश हूँ कि आज रो दूँगा”, आभारी आहे, थोड्या वेळाने ट्विट करेन. आता हात थरथर कापत आहेत.

सायना चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात सायनाची भूमिका अभिनेत्री परिणीती चोप्राने साकारली होती. या चित्रपटातील चल वहीं चले, परिंदा, अ मदर्स लव्ह या गाण्यांचे गीतकार मनोज मुंतशिर आहेत. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018सायना नेहवालपरिणीती चोप्रा