Join us

68th National Film Awards: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली ठरली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 6:23 PM

68th National Film Awards: दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मीप्रिया चंद्रमौली हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Lakshmi Priyaa Chandramouli wins National Award: 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मीप्रिया चंद्रमौली (Lakshmi Priyaa Chandramouli ) हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलुम (Sivaranjiniyum Innum Sila Pengalum) या तमिळ चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने दमदार अभिनय केला आहे. यासाठी तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळाले.

या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत यांनी केलं आहे ज्यांनी शिवरंजिनीम इनुम सिला पेंगलम सारखे महिला केंद्रित चित्रपट तायर केले आहेत. हा चित्रपट वेगवेगळ्या काळातील तीन स्त्रियांची गोष्ट आहे, ज्या पुरुषाच्या अधिकाराविरुद्ध बंड पुकारतात. तिन्ही स्त्रिया वैवाहिक जीवनात दररोजच्या अडचणींमधून जात असतात. तामिळनाडूतील महिलांची स्थिती या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलुम (Sivaranjiniyum Innum Sila Pengalum)हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने अनेक पुरस्कार ही जिंकले. फुकुओका सिटी म्युझियम, जपान आणि आशियाई चित्रपट महोत्सवात त्याचा गौरव करण्यात आला आहे.

या चित्रपटात कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही कौतुक केले. दिग्दर्शक वसंत यांनी या चित्रपटातून एक सशक्त सामाजिक संदेशही दिला होता. त्यामुळेच आता या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018