मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात येत आहे. यंदाचा ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंगला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा तर सुमीत राघवनचा एकदा काय झालं या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा घोषित करण्यात आला. गोदावरीचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर गंगुबाई काठियावाडी या सिनेमासाठी अलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला बेस्ट नरगिस दत्त अवार्ड फॉर बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन पुरस्कार घोषित झाला आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या रेखा या चित्रपटाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.
पुरस्काराची यादी पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट चित्रपट- 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट-एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट - गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जून
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनर - सरकार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरकार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - सरकार उधम सिंग