हे लग्न थोडं हटके होतं. कारण नव-या मुलाचं वय आहे होतं ७२ वर्षे तर नवरीचे वय ३० वर्षे. दोघांच्या वयामध्ये ३०वर्षांचे अंतर असूनही हे कपल रेशीमगाठीत अडकले होते. हे कपल म्हणजे परवीन दुसांज आणि कबीर बेदी. परवीन आणि कबीर फार जवळचे मित्र होते. दोघांनी एकमेकांना सुमारे १० वर्ष डेट केलं. त्यानंतर कबीर यांच्या ७० व्या वाढदिवसाला त्यांनी परवीनशी लग्न केले. विशेष म्हणजे अगदी पहिल्यांदा हे कपल लग्न करत असल्याप्रमाणेच हे लग्न पार पडले विशेष म्हणजे कबीर यांच्यासोबत लग्नासाठी परवीनच्या घरच्यांकडून विरोध होता. मात्र नंतर त्यांनी परवानगी दिली. लग्नात दोघांचीही कुटुंब उपस्थित होते. मात्र कबीर यांचं हे अजब गजब लग्न त्यांची मुलगी पूजा बेदीला हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे ती या लग्नात गेली नव्हती. पूजाने याबद्दल प्रसारमाध्यमांनाही सांगितलं होतं. परवीन मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय टीव्ही निर्मातीही आहे. लग्नाआधी परवीन अनेक वर्ष कबीर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये होती. विशेष म्हणजे कबीर यांची मुलगी पूजा बेदी ही परवीनपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.
कबीर बेदी यांनी या वयात लग्न करत सा-यांनाच धक्का दिला होता. या वयातही लग्न करत त्यांनी आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. लग्नानंतर त्यांच्यावर टीकादेखील करण्यात आली होती. कबीर बेदी यांनी पहिले लग्न नृत्यांगणा आणि मॉडेल प्रोतिमा बेदीसह केले होते. कबीर आणि प्रोतिमा यांची पूजा बेदी ही मुलगी आहे. तर परवीन ही त्यांची चौथी बायको आहे.
'खून भरी मांग' या सिनेमामधील खलनायक किंवा 'मैं हूँ ना' मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदी यांना ओळखतो. त्यांनी अभिनेते, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.