Join us

70th National Film Awards: या सिनेमाने पटकावला 'बेस्ट हिंदी फिल्म'चा राष्ट्रीय पुरस्कार, मनोज वाजपेयींचाही विशेष गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 2:13 PM

या हिंदी सिनेमाला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय

आज ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झालीय. या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट हिंदी फिल्मचा पुरस्कार गुलमोहर या सिनेमाला मिळालाय. मनोज वाजपेयी, शर्मिला टागोर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'गुलमोहर' सिनेमाला बेस्ट हिंदी फिल्मचा पुरस्कार मिळाला. आज ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आलीय. या पुरस्कार सोहळ्यात मनोज वाजपेयींनाही स्पेशल मेंशन पुरस्कार देण्यात आलाय. 

गुलमोहरवर पुरस्कारांचा वर्षाव

मनोज वाजपेयी, शर्मिला टागोर यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुलमोहर' सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. याशिवाय मनोज वाजपेयींना स्पेशल मेंशन पुरस्कार मिळाला आहे. 'गुलमोहर' सिनेमात शर्मिला टागोर आणि मनोज वाजपेयी यांनी आई अन् मुलाची भूमिका साकारलेली. बत्रा फॅमिलीची भावुक गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळाली. सिनेमाच्या वेगळ्या कथेला प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दर्शवली. 

मनोज वाजपेयींचा विशेष सन्मान

याशिवाय ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'गुलमोहर' सिनेमासाठी मनोज वाजपेयींना विशेष पुरस्कार मिळालाय. मनोज वाजपेयींनी 'गुलमोहर' सिनेमात अरुण बत्रा ही भूमिका साकारली होती. या पुरस्कार सोहळ्यात वाळवी हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. याशिवाय 'वारसा', 'आणखी एक मोहेंजो दारो', 'मर्मर्स ऑफ द जंगल' या मराठी डॉक्यूमेंट्री आणि सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमनोज वाजपेयीशर्मिला टागोर