Join us

70th National Film Awards: 'वाळवी', 'ब्रह्मास्त्र' आणि 'कांतारा'ची बाजी, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 3:11 PM

70th National Film Awards: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज १६ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आले आहेत.

70th National Film Awards: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज १६ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आले आहेत. यावेळी प्रशांत नीलच्या KGF या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर 'गुलमोहर' या सीरिजसाठी मनोज वाजपेयीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र'साठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'कांतारा' चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आणि नित्या मेनन, मानसी पारेखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या श्रेणीत कोणाला पुरस्कार मिळाला ते जाणून घ्या:

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: अट्टम (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऋषभ शेट्टी (कंतारा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : नित्या मेनन (थिरुचित्रंबलम) आणि मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सूरज बडजात्या (ऊंचाई)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अरिजित सिंग (केसरिया-ब्रह्मास्त्र भाग १: शिवा)

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: बॉम्बे जयश्री (सऊदी वेलाक्का)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: नीना गुप्ता (ऊंचाई)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पवन राज मल्होत्रा ​​(फौजा)

सर्वोत्कृष्ट पदार्पण: फौजा, प्रमोद कुमार

निखळ मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Feature Film Providing Wholesome Entertainment): कांतारा (कन्नड)

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कार्तिकेय २

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: पोन्नियिन सेल्वन भाग १

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - बागी दी धी

सर्वोत्कृष्ट उडिया चित्रपट - दमन

सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: इमुथी पुथी

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेलाक्का 

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - KGF 2

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - तिरुचित्रबलम

सर्वोत्कृष्ट गीत – नौशाद सदर खान (फौजा)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - प्रीतम (गाणी), एआर रहमान (पोनियिन सेल्वन भाग 1, पार्श्वभूमी स्कोअर)

सर्वोत्कृष्ट मेकअप - अपराजितो

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - निक्की जोशी (कच्छ एक्सप्रेस)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - अपराजितो

सर्वोत्कृष्ट संकलन – आट्टम

सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना - आनंद कृष्णमूर्ती (पोनियिन सेल्वन - भाग १)

सर्वोत्कृष्ट पटकथा – आट्टम

सर्वोत्कृष्ट संवाद - गुलमोहर

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - रवि वर्मन (पोनियिन सेल्वन - भाग १)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार : श्रीपत (मलिकापुरम)

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारकेजीएफअरिजीत सिंहमनोज वाजपेयीनीना गुप्ता