प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर मोस्ट अवेटेड सिनेमा 'साहो' 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने करतायेत. या सिनेमातील दमदार अॅक्शन सीन्सची गॅरेंटी दिली जातेय. टाईम्सच्या रिपोर्टनुसार ऐवढे दमदार अॅक्शन सीन्स कोणत्याच हिंदी सिनेमात नाहीयेत. या अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. आठ मिनिटांचा हा सीन अॅक्शन सीन अबु धाबीमध्ये शूट करण्यात आला आहे.
प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
ट्रान्सफॉर्मर फेम हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर केनी बेट्स यांनी या चित्रपटातील अॅक्शन सीन दिग्दर्शित केले असून प्रभासच्या अॅक्शन दृश्यांवर ते प्रचंड खूश आहेत. या चित्रपटात अॅक्शन सीनचा भरणा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पाऊसात, धुळीत देखील त्यांनी अॅक्शन दृश्यं चित्रीत केली आहेत. तसेच या चित्रपटात कार चेसिंग, बाइक चेसिंग देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याचे चित्रीकरण इटली, अबू धाबी, हैदराबाद आणि मुंबई अशा विविध ठिकाणी करण्यात आले आहे. प्रत्येक अॅक्शन सीन खरा दिसावा यासाठी कित्येक तास आधी तालमी घेतल्या जात आहेत.
साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.