Join us

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर; बॉबी देओलने दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 10:56 IST

Bobby deol: काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली होती.

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी एक्सवर (ट्विटर) काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये मध्यरात्री उठून ते शिळी पोळी खात होते. यावेळी त्यांचे विस्कटलेले केस आणि थकलेला चेहरा पाहून चाहते कमालीचे घाबरले होते. धर्मेंद्र यांना नक्की काय झालंय? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांचा तो फोटो डिलीट केला. हा फोटो डिलीट केल्यानंतर धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं होतं. नातीच्या लग्नात डान्स करत असतांना त्यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच आता 'आजतक' शी संवाद साधतांना बॉबी देओलने त्यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत.

कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती?

"ते आता एकदम व्यवस्थित आहेत. हळूहळू ते रिकव्हर होत आहेत," असं बॉबी देओलने सांगितलं. तसंच धर्मेंद्र यांच्या एका जवळच्या व्यक्तीनेही त्यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र एका फॅमिली फंक्शनसाठी उदयपूरला गेले होते. तिथे त्यांना दुखापत झाली. थकवा आणि वयोमान पाहता त्यांची प्रकृती खालावली. सध्या ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आणि, आराम करत आहेत. लवकरच ते चाहत्यांच्या भेटीला येतील.

दरम्यान, जुलै २०२३ मध्ये करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात ते झळकले होते. या सिनेमातील त्यांचा शबाना आझमी यांच्यासोबतचा किसिंग सीन बराच चर्चेत आला होता. अलिकडेच ते शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमात झळकले होते. त्यानंतर लवकरच ते  'इक्कीस' या सिनेमात दिसणार आहेत.

टॅग्स :धमेंद्रबॉबी देओलसेलिब्रिटीसिनेमाकरण जोहर