हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे फरहीन.
90 च्या दशकातील गाजलेल्या 'जान तेरे नाम', 'नजर के सामने' या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फरहीन दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 1994 साली आलेला चित्रपट 'नजर के सामने'मध्ये अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली होती. विशेष म्हणजे यापूर्वी ती अक्षय कुमार स्टारर 'सैनिक' या चित्रपटात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती.
1997 मध्ये फरहीनने क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. लग्नानंतर फरहीन नव-यासोबत दिल्लीला स्थायिक झाली. 'जान तेरे नाम'चे दिग्दर्शक बलराज साहनी विज यांनी याच चित्रपटाच्या सिक्वेलसाठी फरहीनला विचारणा केली होता. पण तिने आईची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. तारुण्यात आईची भूमिका करणार नसल्याचे तिने कारण पुढे केले होते.
फरहीनचे लूक्स 90 च्या दशकातील सुपरस्टार माधुरी दीक्षितसोबत मिळतेजुळते होते. त्यामुळे तिला माधुरी दीक्षितची जुळी बहीण म्हणायचे. तिच्या चाहत्यांची फॅन फॉलोइंगसुद्धा झपाट्याने वाढली होती. पण लग्नानंतर फरहीनने सिनेसृष्टीपासून सन्यांस घेतल्याने तिचे चाहते निराश झाले होते.
बॉलिवूडपासून दूर असली तरीही पती मनोज प्रभाकरसह तिची खाजगी आयुष्य एन्जॉय करते. लग्नानंतर सेलिबेटींप्रमाणेच आलिशान आयुष्याचा ती आनंद लुटत आहे. फरहीन दोन मुलांची आई असून राहिल आणि मानवंश ही तिच्या मुलांची नावे आहेत. याशिवाय पहिल्या लग्नापासून मनोज यांना एक मुलगा असून रोन हे त्याचे नाव आहे.
फरहीन आता यशस्वी बिझनेसवुमन आहे. दिल्लीत तिचा हर्बल स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे. नॅचरल हर्ब्स असे तिच्या कंपनीचे नाव आहे. 18 वर्षांपूर्वी नव-यासोबत फरहीनने ही कंपनी सुरु केली होती. आज या कंपनीचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात आहे.