मुंबई- उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. अशात उर्फी सध्या अडचणीत आली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वकील असलेल्या अली काशीफ खान देशमुख यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात उर्फी जावेदने अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर उर्फी चांगलीच संतापली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टद्वारे म्हणाली की, माझ्यावर आणखी पोलीस स्थानकांत किती तक्रारी दाखल होतील, याबाबत मला कल्पना नाही. मात्र मला रोज बलात्काराच्या धमक्या येताय. मला जीवे मारण्याच्या धमक्या येताय, त्याबाबत कोणीच काही बोलत नाही, असं उर्फी म्हणाली. तुम्हाला माझा त्रास आहे, पण बलात्कार आणि खून करणार्यांचा नाही?, असा सवालही उर्फीने उपस्थित केला आहे.
दरम्यान, उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच ती big boss बिग बॉस मध्येही होती. तिथुन तिला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मध्ये ती केवळ एक आठवडा राहू शकली मात्र तिथेही तिच्या फॅशन सेन्स ने सर्वांना हैराण केले होते. सध्या उर्फी splitsvilla 14 'स्प्लिट्सव्हिला १४' शो मध्ये दिसून येत आहे ज्यामुळे हा शो सुद्धा चर्चेत आहे.
याआधी उर्फी विरोधात तक्रार झाली होती दाखल-
यापूर्वी एका व्यक्तीने उर्फी जावेदच्या विरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातही अभिनेत्रीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढेच नाही तर 'हे है ये मजबूरी' या म्युझिक व्हिडिओमुळे ती कायदेशीर अडचणीतही सापडली होती. गाण्यात त्याने रिलीव्हिंग आउटफिट घातल्याचा आरोप करण्यात आला होता.