म्युझिक इंडस्ट्रीचा किंग ए. आर. रहमान (A. R. Rahman) याची लेक खतीजा (A. R. Rahman Daughter Khatija Rahman) पुन्हा चर्चेत आहे. काही महिन्यांआधी खतीजाचं लग्न झालं. आता खतिजा रहमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची प्रचंड चर्चेत आहे.खतीजाच्या ‘फरिश्तो’ या म्युझिक अल्बमला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिने ही पोस्ट लिहिली आहे. यात ती लिहिते, ‘फरिश्तो आणि फरिश्ता रिलीज होऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. हा प्रवास सुरु करताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते. मी या चौकटीत बसू शकेन का? ट्रेंड किंवा कपड्यांचा नवीन ट्रेंड फॉलो करणं जमेल का? मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? आणि मी जे कपडे परिधान करते , त्या कपड्यांना पाहणं लोक पसंत करतील का? मी सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकेन का? पण कोणत्याही अटीशिवाय मला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळालीत. हा दिवस माज्यासाठी खूप खास आहे आणि तुम्हा सर्वांसाठी आणखी काम करायला मला खूप बरं वाटतं. फरिश्तो दहा लाख व्ह्यूजपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागलं आणि आम्ही अजून विचार करत आहोत की हे पुढे कसं जाणार...मध्यंतरी खतीजा बुरख्यावरून अचानक चर्चेत आली होती. ‘बुरख्यात माझा जीव गुदमरतो...’, असं ट्विट लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. तस्लिमांच्या या ट्विटवर खतीजाने खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘मला बुरख्यात पाहून तुम्हाला घुसमटल्यासारखं वाटत असेल तर कृपया तुम्ही शुद्ध हवेत जा, मोकळा श्वास घ्या. दुस-या महिलांना कमी लेखणं हा स्त्रीवादाचा अर्थ नाही,’ असं खतीजाने तस्लिमांना उद्देशून लिहिलं होतं.
ए आर रहमान यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘बुरखा घालणं हा खतीजाचा स्वत:चा निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्याआधी आम्हा कुणालाही विचारलं नव्हतं. मला संधी मिळाली तर मलाही बुरखा घालायला आवडेल,’ असं ते म्हणाले होते.ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांना एकूण तीन मुलं आहेत. खतीजा, रहीमा आणि ए. आर. अमीन. खतीजाने काही तमिळ चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी रजनीकांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘एंथीरन के पुडिया मनिधा’ या गाण्यापासून आपला संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु केला.