Join us  

Disney+ Hotstar च्या ग्राहकांना झटका, IPL नंतर आता HBO शो देखील पाहता येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 4:28 PM

सध्या The Last of Us, Game of Thrones, House of the Dragon सारखे HBO चे लोकप्रिय शो Disney+ Hotstar वर दिसतात.

Disney+ Hotstar ने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. 31 मार्च 2023 पासून Disney+ Hotstar OTT वर HBO चा कंटेंट पाहता येणार नाही. कंपनीने याबाबत Twitter हँडलवरुन माहिती दिली आहे. Disney+ Hotstar चा हा निर्णय ग्राहकांना आवडलेला नाही. कारण, यामुळे ग्राहकांना त्यांचे आवडते शो पाहता येणार नाहीत. 

लोकप्रिय शो पाहता येणार नाहीसध्या HBO चे अनेक लोकप्रिय शो Disney+ Hotstar वर दिसतात. यात The Last of Us, Succession, Game of Thrones, House of the Dragon, The Wire, The Sopranos, Silicon Valley सारखे अनेक लोकप्रिय शो आहेत. गेल्या महिन्यात रिलीज झालेला The Last Of Us शो खूप पाहिला जात आहे. 

IPL सह HBO शो बंद होणारविशेष म्हणजे, HBO चे पॉप्युलर शो, IPL आणि इतर क्रिकेट टूर्नामेंटमुळेच Disney+ Hotstar भारतात लोकप्रिय OTT झाला. पण, आता तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर IPL आणि HBO शो पाहता येणार नाहीत. ग्राहक या निर्णयामुळे खूप नाराज आहेत. यामुळे OTT च्या सब्सक्रिप्शन बेसवर वाईट परिणाम पडू शकतो. 

सध्या Disney+ Hotstar प्रीमियमचे सब्सक्रिप्शन 1499 रुपयांना मिळते. पण आता IPL मॅच आणि HBO कंटेंट नसल्यामुळे ग्राहक या OTT कडे पाठ करू शकतात. IPL चे राइट्स आता Viacom कडे गेले आहेत आणि याचे लाईव्ह प्रसारण Jio Cinema वर होणार आहे. जियो सिनेमावरच FIFA वर्ल्ड कपचे प्रसारणदेखील झाले होते.

Disney+ Hotstar ने काय म्हटले?एका ट्वीटला उत्तर देताना Disney+ Hotstar ने सांगितले की, '31 मार्चपासून HBO कंटेंट Disney+ Hotstar वर उपलब्ध होणार नाही. तुम्ही Disney+ Hotstar वरील इतर कंटेंट पाहू शकता. यावर एक लाखांपेक्षा जास्त तासांचे टीव्ही शो आणि मूव्हिज, 10 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यावर अनेक ग्लोबल स्पोर्ट्स इव्हेंटदेखील पाहायला मिळतील.'

टॅग्स :बॉलिवूडहॉलिवूडटेलिव्हिजन