Join us  

शाहरुख खानचा सिनेमा 'किंग'चे खास सीन या शहरात होणार शूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 9:17 AM

Shah Rukh Khan's King Movie : शाहरुख खानचा आगामी 'किंग' चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)साठी २०२३ हे वर्ष स्वप्नवत होते. यावर्षी शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट झाले. आधी पठाण आणि नंतर जवान हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. २०२३ च्या शेवटी, डंकी भेटीला आला. २०२३ मध्ये तीन चित्रपटांतून खळबळ माजवणाऱ्या शाहरुखचा २०२४ मध्ये अद्याप एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तो 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलदरम्यान त्याने या चित्रपटाची पुष्टी केली. आता या चित्रपटाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चित्रपटातील काही खास सीन्स अतिशय सुंदर शहरात शूट करण्यात येणार आहेत.

याआधी शाहरुखच्या आगामी 'किंग' चित्रपटाचे शूटिंग यूकेमध्ये होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, यूकेऐवजी किंगचे काही प्रमुख सीन बुडापेस्ट, हंगेरीमध्ये शूट केले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे युरोपमधील लोकप्रिय शहर आहे. जिथे दरवर्षी १ कोटीहून जास्त लोक भेट देण्यासाठी येतात. आता शाहरुखच्या चित्रपटातील काही ॲक्शन सीन्स याच शहरात शूट होणार आहेत.

शूटिंग कधी सुरू होणार?शाहरुख खानच्या किंग या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही. शाहरुखने अलीकडेच एका मुलाखतीत या चित्रपटाला दुजोरा दिला होता. तेव्हापासून चाहते चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहेत. किंगचे शूटिंग सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

'किंग'मध्ये झळकणार शाहरुखची मुलगी सुहानाशाहरुखसाठी हा चित्रपट खूप खास असणार आहे. खरंतर यात त्याची मुलगी सुहाना खानही त्याच्यासोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभय वर्मालाही किंगसाठी कास्ट करण्यात आले होते. अभय आणि सुहाना एकमेकांच्या विरुद्ध दिसणार असल्याचे बोलले जाते.

अभिषेक बच्चन दिसणार निगेटिव्ह भूमिकेतसुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. मात्र, यात अभिषेक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार आहेत तर सिद्धार्थ आनंद याचे निर्माते आहेत.

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खान