Join us

उघडपणे बघू शकत नाही इतका बोल्ड LSD 2 चा टिझर, रिअ‍ॅलिटी शोमागील काळी बाजू येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:19 IST

LSD 2 चा बोल्ड आणि धाडसी विषय असलेला टिझर रिलीज झालाय. LSD 2 निमित्ताने इंटरनेट युगातील अनोखी कहाणी समोर येणार आहे

गेल्या अनेक दिवसांपासून LSD 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. LSD अर्थात Love Sex Aur Dhoka चा पहिला भाग चांगलाच गाजलेला. त्यामुळे दुसऱ्या भागाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर LSD 2 चा धमाकेदार टिझर रिलीज झालाय. LSD 2 चा टिझर इतका बोल्ड आहे की, उघडपणे तुम्ही बघू शकणार नाही. LSD 2 सिनेमात रिअ‍ॅलिटी शोमागील काळी बाजू उघडकीस येणार आहे.

निर्मात्यांनी 'लव्ह सेक्स और धोखा 2' चा आतापर्यंतचा सर्वात धाडसी आणि बोल्ड टीझर रिलीज केलाा आहे. आधुनिक इंटरनेट युगातल्या तीन समांतर कथांची झलक प्रेक्षकांना टिझरमध्ये दिसते. या टिझरमध्ये डिजिटल जगात प्रेम आणि विश्वासघाताचे परिणाम दाखवण्यात आले आहेत. याशिवाय रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली स्पर्धक कोणत्या थराला जातात, याचीही बोल्ड आणि अपरिचित बाजू पाहायला मिळते.

LSD 2 चं दिग्दर्शन दीबाकर बॅनर्जींनी केलंय. या सिनेमात उर्फी जावेद, तुषार कपूर, अन्नू मलिक, मौनी रॉय आणि इतर नवोदित कलाकार बघायला मिळत आहेत. एकता कपूरच्या बालाजी फिल्मस् ने LSD 2 ची निर्मिती केलीय. LSD 2 हा सिनेमा १९ एप्रिल २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बोल्ड टिझर आणि धाडसी विषय असल्याने प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे.

टॅग्स :एकता कपूरमौनी राॅयउर्फी जावेद