सध्या 'छोटा भीम' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत टेलिव्हिजनवर सर्वांना आवडणारा 'छोटा भीम' आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. 'छोटा भीम' सिनेमाच्या माध्यमातून प्रमोशनच्या नवनवीन कल्पना पुढे येत आहेत. 'छोटा भीम'चा नवीन व्हि़डीओ समोर आलाय. यात भारताचे लोहपुरुष अशी ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आलीय.
'छोटा भीम' सिनेमाच्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं छोटा भीम भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिष्ठित स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे आदरांजली वाहतो. स्वत:च्या धाडसाचे आणि शौर्याचे प्रतिक असलेला छोटा भीम वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ येऊन ऐक्य आणि सामर्थ्याचा शक्तिशाली संदेश देतो. 'दम है हा' हे गाणं बॅकग्राऊंडला वाजताना दिसतं.
भारतीय सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गोष्ट झालेली दिसतेय. राजीव चिलाका दिग्दर्शित आणि राजीव चिलाका आणि मेघा चिलाका निर्मित, 'छोटा भीम आणि द कर्स ऑफ दम्यान' सिनेमा नीरज विक्रम यांनी लिहिलेला आहे. श्रीनिवास चिलाकलापुडी आणि भरत लक्ष्मीपतीसह सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.