Join us

Video: अरबाजसोबत हॉट लूकमध्ये दिसली मलायका; मात्र माध्यमांसमोर तिने केलेल्या कृतीची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 6:36 PM

मुंबईत परतल्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हे नुकतेच नवीन वर्षाची पार्टी सेलिब्रेट करुन मुंबईत परतले. या पार्टीत मलायका आणि अर्जुन सोबत वरुण धवन, नताशा दलाल देखील होते. मात्र मुंबईत परतल्यानंतर मलायका अरोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अरबाज खान आणि मलायका अरोरा ही जोडी एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळी झाली असली, तरी दोघेही एकमेकांसोबत नेहमीच स्पॉट होत असतात. कधी मुलाला एअरपोर्टवर सोडायला, तर कधी मुलासोबत एकत्र जेवायला जाताना मलायका आणि अरबाज एकत्र स्पॉट होतात. आता देखील ते एका हॉटेलमधून बाहेर निघताना दिसले. मात्र यावेळी मलायकाने पुन्हा तिची बोल्ड स्टाईल दाखवली. परंतु माध्यमांसमोर तिने केल्याल्या एका कृतीची चर्चा सध्या सुरु आहे.

मलायका अरोरा एका प्रश्नावर लाजली! अर्जुन कपूरसोबतची बेडरुम सिक्रेट सांगूनच टाकली...

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरबाज खान एका बिल्डिंगमध्ये प्रवेश करतो तेव्हाच मलायका अरोरा त्याच्या मागून येते. या दरम्यान ती अरबाजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि पुढे चालत जाते. ते दोघंही ना थांबतात, ना भेटतात... आणि पुढे जातात. मलायकाला पाहताच अरबाज काही न बोलता तिच्या मागे शांतपणे चालायला लागतो. त्याचवेळी अरबाजच्या हातात एक बाटली आहे, जी गिफ्ट रॅप आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विद मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये मलायकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अगदी लव्ह लाईफपासून, सेक्स लाईफपर्यंत सगळ्या विषयांवर ती बोलली. मलायका अरोराने प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरसोबत चॅट करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. करण जोहर बॉलिवुडमध्ये गॉसिपसाठीही लोकप्रिय आहे. तसेच तो मलायकाचा चांगला मित्रही आहे. करणने मलायकाला अरबाजसोबत आता तिचे नाते कसे आहे अशा प्रश्न केला. यावर मलायका म्हणाली, आमच्यात अजुनही चांगले नाते आहे. पुर्वीपेक्षा आमचे सध्याचे नाते खुप चांगले आहे, असं मलायकाने सांगितले होते.

अर्जुन कपूरसोबत जवळीक-

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत ज्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या लग्नाबाबत अनेक अपडेटही समोर येत असतात. मलायका अरोरा आणि अरबाज यांच्या घटस्फोटानंतर तिची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे बंध आणखी घट्ट झाले आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानबॉलिवूड