बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार 1999 मध्ये आलेल्या 'जनावर' चित्रपटात लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात त्याच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका आदित्य कपाडियाने साकारली होती, त्याचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.
अक्षय कुमारने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून खूप मेहनत केली आहे. पण 1999 सालापर्यंत अक्षयचे चित्रपट थिएटरमध्ये सतत फ्लॉप होत होते, अशात 'जानवर' चित्रपट हिट झाल्यामुळे त्याच करिअर पुन्हा रुळावर आलं. यानंतर अक्षय कुमारने मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आदित्य कपाडिया अक्षयचा मुलगा राजूच्या भूमिकेत दिसला होता. आदित्यच्या क्यूटनेसने सगळ्यांनाच त्याचे वेड लावले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते. मात्र आता अक्षयच्या ऑनस्क्रीन मुलाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचे फोटो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही की हाच तो क्युट मुलगा आहे.
अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट 'जानवर'मध्ये राजूची भूमिका साकारून वाहवा मिळवणाऱ्या आदित्यने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या प्रत्येक पात्राने त्यांनी लोकांची मनंही जिंकली होती. या चित्रपटात आदित्यच्या राजूच्या भूमिकेचीही खूप चर्चा झाली होती. हा चिमुकला भविष्यात मोठा स्टार होईल, असे लोकांना वाटू लागले. पण लहानपणी अक्षय कुमारच्या चित्रपटात राजूची भूमिका साकारणारा आदित्य कपाडिया आता हँडसम दिसायला लागलाआहे.
'जानवर' चित्रपटात अक्षय कुमार, करिश्मा कपूर आणि शिल्पा शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आदित्य कपाडिया फक्त 9 वर्षांचा होता, पण आता निरागस दिसणारा आदित्य बराच मोठा झाला आहे. आता तो 35 वर्षांचा आहे. आज जरी तो चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
आदित्य कपाडियाने 2004 ते 2014 या काळात छोट्या पडद्यावर खूप काम केले, शकलाका बूम बूम या शोमध्ये आपली प्रतिभा दाखवली आणि या शोमध्येही त्याची व्यक्तिरेखा खूप आवडली. आदित्य आता साऊथ चित्रपटांकडे वळला आहे. 2017 मध्ये त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, जरी हा चित्रपट कमाईच्या बाबतीत काही खास दाखवू शकला नाही. आदित्य कपाडिया देखील OTT प्लॅटफॉर्मवर दिसला. 2021 मध्ये आदित्यनेही लग्नगाठ बांधली आहे.