लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती. प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती. अहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अहाना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.
ही वेबसिरीज अहानासाठी खास आहे कारण ती स्वत: एसआरकेची मोठी फॅन आहे. एसआरके द्वारा निर्मित वेबसिरीजचा भाग होणे म्हणजे अहाना तिचे एक स्वपन पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.