Join us

'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:34 AM

Aamir Khan : आमिर खानने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्याने पीके सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा देखील सांगितला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा बहुचर्चित पीके(PK Movieवाला सीन आठवत असेल ना. या सीनमध्ये आमिर खरोखर न्यूड झाला होता. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी अभिनेत्याला एक गार्ड परिधान करायला दिले होते. ते पोटाच्या खाली चिपकवून ठेवायचे होते. आमिरने ते गार्ड परिधान केले पण त्यासोबत त्याला शूटिंग करताना खूप अडचणी येत होत्या. ते सारखे सारखे निघत होते. शेवटी त्याने कंटाळून ते काढून टाकले आणि असेच शूट करू लागला. यादरम्यान सेटवरून क्रू मेंबर्स कमी करण्यात आले होते.

आमिर खानने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्याने पीके सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा देखील सांगितला. तो म्हणाला की, मला आधी खूप विचित्र वाटत होते की, सेटवर कोणी न्यूड कसे काय होते. पण पीके सिनेमात काम केल्यानंतर माझे मत बदलले. पीके सिनेमात सुरूवातीच्या सीनमध्ये मला एका माणसाच्या मागे धावायचे होते. ते शूट करणं खूप आव्हानात्मक होते. राजू (राजकुमार हिराणी)ने त्यासाठी मला एक गार्ड परिधान करायला दिले होते. त्यांनी सेटवरून लोकांना कमीदेखील केले.

सुरूवातीला थोडं विचित्र वाटलं...आमिर पुढे म्हणाला की, मला ते गार्ड घालून त्या माणसाच्या मागे धावायचे होते. मात्र ते गार्ड सारखे सारखे ओपन होत होते. शेवटी मी वैतागून राजूला म्हटलं हे काढून टाक यार. त्यानंतर मी गार्डशिवाय सीन करू लागलो. मला थोडं विचित्र वाटलं होतं. कारण यापूर्वी मी असे कधीच केले नव्हते. मात्र नंतर मी विचार करू लागलो की, मला कसेही करून परफेक्ट शॉट द्यायचा आहे.

ब्लॉकबस्टर झाला होता पीके१९ डिसेंबर, २०१४मध्ये रिलीज झालेल्या पीकेने जगभरात ७७० कोटींचं कलेक्शन केलं होतं. हा त्या वर्षातला सर्वात मोठा हिंदी सिनेमा होता. चित्रपटाने देशभरात ३४० कोटींचं कलेक्शन केलं होतं. चित्रपट काही सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. असे म्हटले होते की, चित्रपटात हिंदू देवी देवतांचा अपमान दाखवला गेला आहे. काही ठिकाणी यावरून विरोध प्रदर्शनेदेखील झाले होते.   

टॅग्स :आमिर खानराजकुमार हिरानी