आमिर खानने पुन्हा चालवलायं शरीराशी खेळ! विश्वास बसत नसेल तर पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 8:38 AM
आमिर खानला उगाच बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ म्हटले जात नाही. आपल्या चित्रपटासाठी तो कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. अगदी स्वत:च्या शरीरासोबत खेळही ...
आमिर खानला उगाच बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ म्हटले जात नाही. आपल्या चित्रपटासाठी तो कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. अगदी स्वत:च्या शरीरासोबत खेळही करू शकतो.होय, शरीरासोबत खेळच!! ‘दंगल’साठी त्याने हेच केले. आधी खूप वजन वाढवले. यानंतर लगेच वजन कमीही केले. खरे तर डॉक्टरांनी त्याला शरीराशी असा खेळ न करण्याचा सल्ला दिला होता. तरिही डॉक्टरांचा सल्ला अव्हेरून आमिरने जे करायचे ते केलेच. याचे परिणाम तुमच्यासमोर आहेतच. ‘दंगल’ आजही बॉक्सआॅफिसवर धूम करते आहे. ‘दंगल’नंतर आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटातील भूमिकेत फिट बसण्यासाठी आमिरने पुन्हा एकदा आपल्या शरीराशी खेळ चालवला आहे. होय, यासाठी तो कमालीच्या वेदनेतून जातोय.या चित्रपटातील स्वत:ची व्यक्तिरेखा आमिरने अशी काही आपलीशी केली की, नाक टोचून घेतले. कान टोचून घेतले. केवळ इतकेच नाही तर शरीराचे अनेक भाग टोचवून घेतले. विशेष म्हणजे या साºया गोष्टी नकली नाहीत. आमिरने खरोखरीच नाक, कान टोचून राजस्थानी स्टाईलचे दागिने परिधान केले आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने मेहनत करुन आपले ५० किलो वजन कमी केले आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ च्या सेटवरचे आमिरचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात आमिर सळपातळ दिसत आहे. आमिरने फक्त आपले वजनच कमी केले नाही, तर पूर्णत: आपले बॉडी टाइपदेखील बदलला आहे. ALSO READ : आमिर खानने ‘या’ चित्रपटासाठी ५० किलो वजन केले कमी !या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. सना शेखने ‘दंगल’मध्ये आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता आमिर इतकी मेहनत घेतोय म्हटल्यावर हा चित्रपट पाहायला तुम्ही उत्सुक असालच. त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा बस्स!!