Join us

आमिर खानच्या आयुष्यात आलेल्या मुलीचं नावही आलं समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:46 IST

आमिरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ५९ वर्षीय अभिनेता पुन्हा प्रेमात पडला आहे. दोन घटस्फोटानंतर त्याच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. आमिरने तिची आपल्या कुटुंबाशीही भेट घालून दिल्याचं बोललं गेलं. आता आमिरच्या गर्लफ्रेंडचं नाव समोर आलं आहे. होय सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा आहे.

आमिर खानच्या लव्हलाईफची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आमिरच्या आयुष्यात ५९ व्या वर्षी नवीन मुलीची एन्ट्री झाली आहे. मात्र त्याला तिच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाहीए. तरी पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, ही मुलगी बंगलोरची असून आता तिचं नावही समोर आलं आहे. तिचं नाव गौरी असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गौरी आमिरच्या कुटुंबालाही भेटली आहे. अद्याप आमिरने मात्र या सर्व चर्चांवर काहीच भाष्य केलेलं नाही त्यामुळे यात किती तथ्य आहे हे तोच सांगू शकेल.

आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्ता होती जी त्याची बालमैत्रीण होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १९८६ मध्ये लग्न झाल्यावर १६ वर्षांनी २००२ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर आमिरने २००५ साली किरण रावशी लग्न केलं. त्यांनी आजाद मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला. मात्र किरणसोबतही आमिरचं नातं १६ वर्षांनी तुटलं. आता आमिरच्या आयुष्यात गौरीची एन्ट्री झाल्याच्या चर्चा आहेत.  यावरुन अभिनेता चांगलाच ट्रोलही होत आहे.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडरिलेशनशिप