बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) आज ६० वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच काल त्याने पापाराझी आणि माध्यमांसोबत सेलिब्रेशन केलं. यावेळी त्याने सर्वांना एक सरप्राईजही दिलं. आमिर गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt) तो डेट करत आहे. काल त्याने गौरीला सर्वांसमोर आणलं तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गौरीबद्दल तो का म्हणाला आणि त्याच्या मुलांची यावर काय प्रतिक्रिया आहे वाचा.
आमिर खान ६० व्या वर्षी रिलेशनशिपमध्ये आहे यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीए. दोन घटस्फोटांनंतर आता तो तिसऱ्यांदा लग्न करणार का अशी चर्चा सुरु आहे. काल माध्यमांसमोर आमिरने गर्लफ्रेंडची ओळख करुन दिली. तो म्हणाला, " मी खूप नशिबवान आहे कारण मी कायम घट्ट नात्यातच राहिलो आहे. जसं रीना आणि मी १६ वर्ष सोबत होतो. किरणसोबतही १६ वर्ष होतो. आजही मी त्या दोघींसोबत आहे. मी या नात्यांमधून खूप शिकलो आणि समृद्ध झालो. आता गौरीसोबत मला सेटल झाल्यासारखं वाटतंय. मी आणि गौरी गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ती बंगळुरुची आहे आणि एका मुलाची आई आहे. दीड वर्षांपासून आम्ही डेट करत आहोत आणि खूप सीरिअस आहोत. गौरीला सौम्य आणि हुशार पार्टनरच्या शोधात होती. आता ती सुद्धा खूश आहे. प्रोडक्शन हाऊसमध्येच ती काम करत आहे."
लग्नाच्या प्रश्नावर आमिर हसतच म्हणाला, "वयाच्या ६० व्या वर्षी मला लग्न करणं शोभा देईल की नाही माहित नाही. पण माझी मुलं माझ्यासाठी खूश आहेत. त्यांना माझ्या या नात्यामुळे काही अडचण नाही. तसंच माझ्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत माझे आजही चांगले संबंध आहेत त्यामुळे मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो."
आमिर खान काल माध्यमांसमोर गंमतीत असंही म्हणाला की आता सलमाननेही गौरी शोधावी म्हणजे तीनही खानची गौरी होईल. विशेष म्हणजे आमिरने गौरीची ओळख शाहरुख-सलमानशीही करुन दिली आहे. सध्या बीटाऊनमध्ये आणिर-गौरीच्या या नात्याचीच चर्चा आहे.