Join us  

Aamir Khan Kiran Rao Divorce Reason: का घेतला घटस्फोटाचा निर्णय? अखेर 8 महिन्यानंतर आमिर खान बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 10:24 AM

Aamir Khan Kiran Rao Divorce Reason: जुलै 2021 मध्ये आमिर खान व किरण राव यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मुळात आमिर व किरणने हा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. आता खुद्द आमिरने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहं. 

Aamir Khan Divorce Reason:  जुलै 2021 मध्ये आमिर खान (Aamir Khan) व किरण राव (Kiran Rao) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा कपलचा हा निर्णय चाहत्यांसाठीही धक्कादायक होता. मुळात आमिर व किरणने हा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. असं काय बिनसलं की, दोघांनी इतका टोकाचा निर्णय घ्यावा? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता खुद्द आमिरने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहं. 

होय,‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर यावर बोलला. किरणला घटस्फोट देण्याच्या निर्णय का घेतला? असं विचारलं असता तो म्हणाला,‘ फॅमिली म्हणून आपण काही चर्चा करत असलो तरी, तू वेगळ्याच विचारात मग्न असतो, असं किरण मला म्हणायची. तू वेगळाच माणूस आहेस, असं ती मला नेहमी म्हणायची. पण तू आहेस तसाच राहा. तू बदलावं अशी माझी इच्छा नाही. कारण तू बदलास तर मी ज्याच्यावर प्रेम केलं तो तू राहणार नाहीस, असंही ती मोठ्या प्रेमानं म्हणायची. सात वर्षांपूर्वी किरणने म्हटलेल्या या गोष्टींबद्दल आज मी विचार करतो तेव्हा गेल्या 6-7 महिन्यांत माझ्या स्वत:मध्येच अनेक बदल झाल्याचं मला जाणवतं.’

लोकांना आमचं नातं कधीच कळणार नाही....किरणजी व मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल अपार आदर व प्रेम आहे. लोकांना आमचं नातं कधीच कळणार नाही. ते कधीच समजू शकणार नाहीत. आमचा घटस्फोट अन्य रिलेशनशिपमुळे झालेला नाही, असंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. किरण व आमिरचा घटस्फोट झाला तेव्हा आमिर व फातिमा सना शेख यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. फातिमामुळे किरणने आमिरला घटस्फोट दिला, अशीही चर्चा होती. आमिरने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. ‘असं काहीही नाही. ना त्यावेळी मी कोणत्या रिलेशनिपमध्ये होतो, ना आज आहे,’ असं त्याने स्पष्ट केलं.

-पण आजही आम्ही एकमेकांसोबत आहोत...आज भलेही आमच्या नात्याचे संदर्भ बदलले आहेत. पण आजही आम्ही एकमेकांसोबत आहोत. एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एकमेकांसोबत काम करत आहोत. आम्ही आजही एकमेकांच्या कुटुंबाचे सदस्य आहोत. पती-पत्नी म्हणून आमचं नातं बदललं आहे. आम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनाला आदर देऊ इच्छित होतो. पण आम्ही एकत्र काम करत आहोत. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, किरणजी  त्याच बिल्डिंगच्या वरच्या फ्लोरवर राहतेय, असंही आमिर म्हणाला. 

टॅग्स :आमिर खानकिरण रावबॉलिवूड